पांगरी (गणेश गोडसे)  बार्शी तालुक्याच्या पूर्व भागात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच झडू लागाल्या असून विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत भरली असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीच्या मैदांनातील लढवय्ये आपण गत कलावधीत केलेल्या विकासकामांचा पाढा जनतेसमोर वाचून आपणच कसे सज्जन उमेदवार आहोत हे दाखवून देण्याचा अठ्हास करत आहेत. एकाच कार्यकर्त्यांचा दिवसात तीन तीन पक्षात प्रवेश होण्याचे गमतीदार किस्सेही घडू लागले आहेत. राजकारण,कार्यकर्ते,त्यांचे नेत्यावरील प्रेम,निष्ठा आजवरचे हितसंबंध याच्यावर जनताही नेत्यांप्रमाणे काशी विष्ठा ठेऊ लागली आहे हे याची देही याची डोळा पाहण्याची संधी सध्या जनतेला उपलब्ध झाली आहे.कोण आतून कोण बाहेरून असे अनेक करमणुकीचे किस्से निदर्शनास येत आहेत.सकाळी एका नेत्यांच्या प्रचारफेरीत फिरणारा नेता सायंकाळी दुसर्‍याच नेत्यांच्या व्यासपीठावर उघडपणे दिसू लागले आहेत.अनेक वर्ष निष्ठा पूर्वक काम करणारे रातोरात दलबदलूची भूमिका घेत आहेत.
  बरेच कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत:
मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना व नेते मंडळी,उमेदवार प्रचारात गुंग असताना त्यांचे फिरत्या कार्यकत्यायांकडे दुर्लक्ष होत असल्याचा अश्या कार्यकर्त्यांनाचा आरोप आहे.निवडणुकीच्या निमिताने प्रचार सभा,प्रचार फेरी,कॉर्नर बैठका,गुप्प्त बैठका,विचारमंथण बैठका यासह कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात नेतेमंडळी गुंग आहे.सध्या तुरळक कार्यकर्त्यांच्या खिशातच रंगी बेरंगी गांधी छाप फिरू लागल्या असून इतर कार्यकर्त्यावर मात्र अन्याय होत असल्याच्या भावना उघडपणे व्यक्त करत आहेत.काही पक्षांकडून ताटली बाटली आदींची सोय झाली असली तरी काहींना समोरच्यानच्या तोंडाकडेच बघत बसावे लागत आहे.हे साहित्य आपल्याकडे कधी पोचणार यासाठी ते आशाळभूतपणे विरोधकाकडे पाहत आहेत.
भीषण दुष्काळाच्या सावटाकडे दुर्लक्ष:
गत चार वर्षापासून दुष्काळाच्या छायेत कसाबसा जगत असलेल्या व भीषण दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बार्शी तालुक्यातीळ शेतकर्‍यांच्या परिस्थितिकडे राजकारणी सोयिस्कर दुर्लक्ष करून निवडणुकीचे तुणतुणे त्यांच्यासमोर वाजवत आहेत.शेतकरी किती भयानक अवस्थेतून जात आहे याची साधी कल्पनाही या राजकारण्यांना नसावी.सभेसाठी गर्दी खेचण्यावर नेत्यांची मदार आहे.मात्र गर्दीतील दर्दी  किती याचा शोध पुढार्याणी घेणे गरजेचे आहे.कोण किती गर्दी खेचू शकतो,गर्दी खेचण्याची ताकत कोणाकडे आहे,आम्ही कमी नाहोत,बघू काय ते अश्या अनेक प्रकारच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.अगोदरच सतत गायप होणारी वीज,वाळत चाललेली शेतातील उभी पिके,जनावरे कशी जगवायची या विचाराने चिंताग्रस्त झालेला शेतकरी त्याच्याच कामात व्यस्त आहे.निवडणूकामागून निवडणुका येतात देश पातळीपासून स्थानिक स्तरावरील नेते खोटी नाटी आशवासणे देऊन जनतेला भूल थापा मारून आपली पोळी भाजून घेतात.असाच अनुभव येत असल्याचे मतदारांचे म्हणने आहे.त्यामुळे औदा सागल्याचेच पैसे घ्यायचे असा मानस मतदारांनी केला असल्याचे बोलले जात आहे.वरुण काही आलाय का नाही अजून असे कार्यकर्ते स्थानिक नेत्यांना दरडाऊन विचारू लागले आहेत.
नाराजांची मनधरणी
गत कालावढीत व धावपळीत ग्रामीण भागातील गावोगावाच्या दुरावलेल्या कार्यकर्‍यांची मनधरणी करता करता उमेदवारांच्या नाकी नऊ आले असून एरव्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे नेते त्यांचे उंबरठे झिजऊ लागल्याचे दृशय दिसत आहेत.कार्यकर्तेही नेत्यांची कळ मारत आहेत.
 
Top