उस्मानाबाद - राज्यात बऱ्याच संस्था/व्यक्तीविशेषता दिवाळी व उन्हाळी सुटयात साहसी क्रीडा प्रकारातील ट्रेकींग, मांऊंटिअरींग, स्कीइंग, पॅरासेसलींग, पॅराग्लाईडींग, जलक्रीडा आदि प्रकारच्या मोहिमा /कॅम्प/ सहली  आयोजित करतात. या व्यक्ती व संस्थेकडे परवाना नसते. शिवाय त्या क्षेत्रातील  प्रशिक्षण घेतलेले नसते, अनुभवही नसते, त्यामुळे मोहीमेत अपघात होवून आकस्मीक  परीस्थीती उदभवून प्राणास मुकावे लागते. त्यामुळे अशा कॅम्प/ सहली/ मोहीमा आयोजित  करणाऱ्या व्यक्ती  संस्थांने जिल्हा क्रीडा कार्यालयात एक हजार   रुपये शुल्क भरुन आपल्या सर्व कागदपत्रासह व माहीतीपत्रकासह नोंदणी  करावी. अधिक माहि तीसाठी जिल्हा   क्रीडा अधिकारी  कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा  अधि कारी ,उस्मानाबाद  यांनी एका प्रसि ध्दीपत्रकाव्दारे  केले आहे.    
 
Top