उस्‍मानाबाद स्‍टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखाली 18 ते 45 वयोगटातील पुरुषासाठी उस्मानाबाद येथे19  ऑक्टोबर ते दि. 8 नोव्हेंबर या कालावधीत 21 दिवसाचे बेसिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी  प्रशिक्षण येथील राजे कॉम्प्लेक्स 3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद  येथे आयोजित करण्यात आले आहे.
    या प्रशिक्षणात फोटोग्राफी ओळख व इतिहास, कॅमेराची काळजी, खबरदारी उपाय, सुटे भाग, लेन्सचे प्रकार व उददेश, पिक्चर काम्पोसिझन  व त्यांचे टप्पे, दिगीतल फोटोग्राफी ओळख, डीएसएलआर कॅमेराचे पार्ट व त्याची कार्यपध्दती, लाइटनिंग व त्यांचे मार्ग, आऊटडोअर फोटोग्राफी स्टेडिओ सेटकरणे, डिजीटल डार्क रुम, फोटोशॉपची ओळख, करिझमा अल्पबम तयार करणे आदि व थेरी व प्रॅक्टीकल प्रोजेक्टरव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
    प्रशिक्षणात मोफत जेवण, राहणे व स्टेशनरी पुरवठा करण्याची सोय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यससाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहाल. तरी इच्छुक पुरुषांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोगाची निर्मिती करुन स्वावलंबी व्हावे, असेआवाहन संस्थेचे संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे.
    प्रशिक्षण प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्रय रेषेखालील दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला, वय व शैक्षणिक  पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, मार्कलिस्ट, आयडेटीटी साईज 5 छायाचित्र व इतर कागदपत्रासह व्यक्तीशा भेटावे अथवा भ्रमणध्वनी क्रमांक-9763624998, 7030320255, 9923069923, 9552858521 संपर्क साधण्याचे आवाहन स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  संचालकांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.    
 
Top