पांगरी (गणेश गोडसे)  जग बदलतय,जवळ येतय,अनेकांनी सगळे मुठीत बंद केलय.देवादिकासह  खूप पुरातन काळापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रथा अस्तीत्वात आहेत.देवलोकात नारद यांनी बजावलेली भूमिका म्हणजेच आधुनिक काळातील पोस्ट्मन होय.दिवसेंदिवस पोस्ट खाते कात टाकत आहे.प्राचीन काळापासूनच पत्राद्वारे एकमेकांशी  संपर्क साधण्याची रूढ आहे.  'पेहले प्यार की पहली चिठ्ठी साजण को दे आ,कबुतर जा कबुतर जा'या चित्रपटातील गीतात टपालाचे महत्व संगितले आहे.
     9 ओक्टोंबर 1874 साली स्वित्झर्लंड मधील बर्न येथे युनिव्हर्शल पोस्टल यूनियनची स्थापना करण्यात आली तेव्हापासून या दिवशी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येऊ लागला. चिठी आई है,चिठी आई है,या गीतात चिठीचे महत्व सांगितले आहे.पूर्वीच्या काली दूरदूर प्रवास करून प्रवासी टपाल वितरित करत असे.नंतर सर्वांनी एकत्रित येत करार करून टपाल वाटपाची योजना आखून ती आमलात आणली.भारतीय पोस्ट खातेही आजच्या आधुनिक कालाबरोबर काट टाकत आहे.नव नवीन प्रकारच्या सेवामधून जनतेला खेचून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.दहा दहा वर्षांनंतर पोस्टाची पत्रे मिळाल्याच्या गमतीदार घटना घडलेल्या असल्या तरी आज तेच काटे संगनकीकृत झाले आहे.ईलेक्ट्रोनिक मनिऑरडरच्या  माध्यमातून आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अवघ्या काही कालावधीत पैसे ग्राहकाला पोच करण्याची तसेच जलद सेवा आदीतूनही तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न पोस्ट खाते करू लागले आहे॰विविध खाजगी सेवा एका छत्राखाली आणण्यासाठी बँक,एटीएम आदि विविध लोकोपयोगी सेवा देण्याचा प्रयत्न भविष्यात पोस्ट खाते करणार आहे.स्पीड पोस्ट,रजिस्टर पोस्ट,रजिस्टर पार्सल,इमओ ,आय एम ओ,आदी सेवा पुरवल्या जातात.तसेच पोस्टल लाइफ इंसुरन्स,ग्रामीण पोस्टल लाईफ  विमा योजना यामधून विमाही पुरवला जात आहे.ग्रामीण क्षेत्रात बँका,पत पेढ्या,किवा पैसे साठवण्याचे कोणतेही साधन अस्तीत्वात नव्हते तेव्हापासून ग्रामीण भागातील जनतेच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी एस.बी,आर,डी,एम.आय.एस,पी.पी.एफ, एस.सी.एस.एस,टी.डी,एन.आर.ई.जी.एस,एन.एस.सी,के.व्ही.पी,आदि प्रकारच्या बचत सेवामधून बचतीचे महत्व पटवून जनतेला पैसा बचत करण्यास प्रवृत केले जाते।
खाजगी कुरीयर सेवेशी स्पर्धा: आजच्या टपाल ववस्थेला नवीन तंत्रज्ञान,आधुनिकीकरण, जागतिकीकरण तसेच विस्तार आदि बाबीसह खाजगी कुरीयर सेवेसीहि स्पर्धा करावी लागत आहे.टपाल सेवेप्रमाणेच खाजगी कुरीयर सेवाही भरवशयाची वाटू लागल्यामुळे सध्या टपाल सेवेला खूप मोठी स्पर्धा करत आपले जनमानसातील स्थान टिकऊन ठेवावे लागत आहे.कितीही खाजगी सेवा रुजू झाल्या असल्या व जग आधुनिकतेकडे धावत सुट
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालयाच्या नियंत्रणाखाली 51 पोस्ट कार्यालये असून 518 अंतर्गत पोस्ट कर्मचार्‍यांसह 370 ग्रामीण पोस्ट कर्मचारी सेवा बजावत आहेत॰ग्रामीण भागात एकाच पोस्टमनकडे अनेक गावांचा अतिरिकत कारभार असल्यामुळे त्यांना कामाचा खूपच तान असून त्यांच्या मानधनात वाढ करावी अशी त्यांची मागणी आहे.
ले असले तरीही पोस्टमनची प्रत्येकजण वाट पहातच असतो.
 
Top