बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौंन्सिल व आयटक च्या वतिने बार्शीत पाथर्डी येथील ३ दलितांच्या हत्या झाल्याच्या विरोधात शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे ७०० कामगार व कार्यकर्ते सहभागी होते.
अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालूक्यातील जवखेडे येथे संजय जाधव यांचेसह त्याची पत्नी व मुलगा यांची निर्धुन हत्या करण्यात आली हे कुटुंब दलित समाजातील होते. यापूर्वीही अहमदनगर जिल्हातील दलित कुटूंबातील सदस्यांवर हल्याची घटना घडली होती. दलित कुटुंबीयांची हत्या करणारांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कडक कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी बोलतांन कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले देशात दलित, मुस्लीमांवर हल्ले होत आहेत. देश जातीयवादी व धर्मांधांच्या ताब्यात गेल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे आता पुढील काळात कामगार आणि दलितांनी एकत्र येवून आर्थीक व सामाजीक लढा सोबत लढला पाहिजेन्न यावेळी कॉ. प्रविण मस्तुद, कॉ. शौकत शेख, कॉ. राजेंद्र गोरे यांनी विचार व्यक्त केले.
 हा मोर्चाचे निवेदन निवासी नायब तहसिलदार उत्तम पावार, श्री कळढोणे यांनी स्विकारले. मोर्चा यशस्वीतेसाठी विनायक माळी, केतन शेळके, सम्राट अलाट, संतोष बनसोडे, ताई लोकरे, रंगनाथ शिराळ, धनंजय शिंदे, शारदा पंढरपुरे, वैजंती गोरे, बालाजी वाघमारे, संदीप गायकवाड, साधना वाघमारे, रमाबाई कुचेकर यांनी परिश्रम घेतले.
 
Top