बार्शी -: बार्शीतील कॉंग्रेस (आय)चे उमेदवार सुधीर गाढवे यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागातील संपर्क दौर्‍यानंतर बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताचे दर्शन घेऊन शहरात संपर्क दौरा व प्रचारफेरीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन मतदारांशी संपर्क, भेटी घेत, कॉंग्रेसचे विचार मतदारांमध्ये पोहोचविण्यात आले. यावेळी उमेदवार सुधीर गाढवे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील, रमजानभाई पठाण, कमलोद्दीनभाई काझी, मुरलीधर देशमुख, काझी साहेब, दत्ता गाढवे, विजयसिंह जगदाळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, इब्राहीमभाई शेख, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top