बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  बार्शी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच उमेदवारांची धावपळ सुरु असतांना कॉंग्रेस (आय) पक्षाचे उमेदवार सुधीर गाढवे यांनी ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे संपर्क अभियान छेडले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर गाढवे यांनी तालुक्यातील गाडेगाव, शेलगाव (व्हळे), खडकलगाव, ताडसौंदणेे आदी भागात पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन प्रचार केला. पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे चिन्ह स्वत: करणार असलेल्या कामाची थोडक्यात माहिती सांगत, ग्रामीण भागातील गरजेच्या प्रश्‍नांची माहिती घेण्याचे व माणसाला माणसे जोडण्याचे काम करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची शेतातील कामे सुरु असून अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या शेतामध्येही भेटून कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अगदी शेतकर्‍यांच्या बैलगाडीत बसून त्यांच्यासोबत थोडा वेळ चर्चा करुन प्रचाराचे कार्य सुरु आहे.
 मुस्लिम बांधवांच्या बकरीईद सणाचे औचित्य साधून उमेदवार सुधीर गाढवे यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमजानभाई पठाण, ज्येष्ठ पदाधिकारी मुरलीधर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील, विश्वजीत ठोंबरे, बी.आर.देशमुख, बुर्‍हाण शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. फोटो ओळी : ग्रामीण भागात मतदारांशी भेटी घेतांना शेतकरर्‍यांशी मनमोकळ्या गप्पा मारुन शेतकरर्‍यांची धनदौलत असलेल्या बैलगाडीचा आनंद घेतांना
 
Top