उस्मानाबाद :- राज्यातील उस्मानाबाद,लातूर, बीड आणि अहमदनगर या  पाच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या युवकांसाठी बीड येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2014 या कालावधीत सैन्य भरती  होणार आहे. भरतीसाठी आवश्यक शारिरीक व शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या व सैन्यात भरती होऊ इच्छिणा-या युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे येथील सेना भरती मुख्यालयाचे संचालक कर्नल विक्रम दुबे यांनी  केले आहे. 
     सैन्यातील सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर टेक्नीकल, सोल्जर ट्रेड्समन या पदांसाठी तारीखनिहाय 5 जिल्ह्यातील उमेदवारांची खुली भरती होईल. पदांची संख्या अमर्याद असून भरतीची तारीख व जिल्हा किंवा त्यातील तालुका याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 
31 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हयातील उमेदवारांची भरती होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हयातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर या तालुक्यातील उमेदवारांची भरती होणार आहे. 
    2 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हयातील अहमदनगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा या सात तालुक्यातील उमेदवारांची भरती होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हयातील उमेदवारांची  तर 5 नोव्हेंबर रोजी बीड जिल्हयातील अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, धारुर, केज आणि परळी या सहा तालुक्यातील उमेदवारांची आणि  6 नोव्हेंबर रोजी बीड जिल्हयातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार आणि गेवराई या पाच तालुक्यातील उमेदवारांची भरती होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी लातुर जिल्हयातील उमेदवारांची भरती होणार आहे. याशिवाय 8 नोव्हेंबर रोजी जिल्हयातील सैन्यातील अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मवारी व युध्दातील शहिदांच्या विधवांच्या मुलांसाठी तसेच क्रीडापटू आदिंची भरती होणार आहे आणि 9 नोव्हेंबर रोजी फक्त वैद्यकीय परीक्षा होणार आहे. 
      यासाठी शैक्षणिक व शारिरीक पात्रता पदनिहाय पुढीलप्रमाणे आहे : सोल्जर जी. डी. या पदासाठी 10 वी इयत्ता उत्तीर्ण, 45 टक्के गुण असावे किंवा 12 उत्तीर्ण असल्यास टक्केवारीची गरज नाही. वय 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्ष, उंची 168 से.मी., वजन 50 किलो, छाती 77 आणि फुगवुन  82 सें.मी असावी.
 सोल्जर टेक्निकल या पदासाठी भौतिकशास्त्र रसायन शास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह बारावी इयत्ता उत्तीर्ण असावा. वय 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष, उंची 167 सेंमी, छाती 76 आणि फुगवुन 82 से.मी. व वजन 50 किलो ग्रॅम असावे.
      सोल्जर लिपीक तथा स्टोअर किपर या पदासाठी कोणत्याही शाखेत 12 वी उत्तीर्ण असावा, सरासरी 50 टक्के गुण प्रत्येक विषयात कमीत कमी 40 टक्के गुण आवश्यक, इंग्रजी आणि गणित, अर्थशास्त्र किंवा बुक किपींग या अनिवार्य  विषयासह  10 वी किंवा 12 वी शिकणाऱ्या दोन विषयात 40 टक्के कमीत कमी  गुण आवश्यक असावेत.  पदवीधर असल्यास टक्केवारी शिथील, वय 17 वर्ष 5 महिने ते 23 वर्ष, वजन 50 किलो ग्रॅम. उंची 162 सेंमी व छाती 77 ते 82 सेंमी. सोल्जर नर्सिंग सहाय्यक या पदासाठी बारावी उत्तीर्ण, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी विषयासह सरासरी 40 टक्के गुण व प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असावेत. बी.एस्सी असल्यास वनस्पतीशास्त्र, जंतुशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी या विषयात केवळ उत्तीर्ण असावा. वय 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष असावे. वजन 50 किलो, उंची 167 सेमी. व छाती 77 व फुगवुन 82 सेंमी असावी.
    सोल्जर ट्रेडमेन  या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. वय 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष, उंची 168 सें.मी., छाती 76 व फुगवुन 81 सें.मी. आणि वजन 48 किलो ग्रॅम असावे. भरतीसाठी येताना उमेदवारांनी दहावी, बारावी, उच्च शिक्षणाची प्रमाणपत्रे, शाळा कॉलेज सोडल्याची टी. सी. आणावी किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे रहिवाशी प्रमाणपत्र व संबंधित पोलीस ठाण्याचे मागील सहा महिन्याचे चारित्र्य प्रमाणपत्र सोबत आणावे. जातीचे प्रमाणपत्र आणावे जर उमेदवार खुल्या प्रवर्गातील असेल तर सरपंचाचे प्रमाणपत्र चालेल. रहिवासी व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. स्वत:ची पासपोर्ट आकाराची 16 छायाचित्रे आणावीत. सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य असल्यास संबंधित कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र आणावे. भरतीसाठी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथे उपस्थित रहावे. सकाळी 3 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल. 1.6 कि.मी. धावण्याची व इतर तपासणी सकाळी 6 वाजता सुरु करण्यात येईल. सैन्यभरती विनामुल्य, मोफत, विनामोबदला केली जाते. भरती प्रक्रियेत कोणताही एजंट नाही. दलालाच्या फसवेगिरी पासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हयाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही पुण्याच्या सैन्य भरती मुख्यालयाचे संचालक कर्नल विक्रम दुबे यांनी केले आहे.                                           
 
Top