तुळजापूर-   कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई तुळजाभवानीची श्रमनिद्रा पूर्ण होते. आज आश्विनी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्‍यासह परराज्यातून मंगळवार रोजी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. मात्र दुपारच्यावेळी आलेल्या पावसाने भाविकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र  तुळजापूरात दिसुन आले.
   नवरात्र महोत्सवानंतर  अश्विन कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्‍यासह परप्रांतातुन  येणा-या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावर्षी ही पायी चालत मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूरला दाखल होत आहेत .
शहरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून निघाले होते. देशभरातुन कोजागिरी पौर्णिमेसाठी पायी चालत येणा-या भाविकांची संख्या लक्षणिय असते. शहरात येणारे सर्वच रस्ते पायी चालत येणा-या भाविकांमुळे गर्दीने भुलून गेले होते. कर्नाटक राज्यातील भाविक मागील चार ते आठ दिवसांपासून चालत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघतात. व अश्विन पौर्णिमेदिवशी तुळजाभवानी मातेच्या चरणी दाखल होतात. या भाविकांना पायी चालत येण्यासाठी कोणत्या ही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी जागोजागी सामाजिक मंडळ तसेच नागरिकांकडून त्यांच्या राहण्याची, व जेवणासह पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. त्यामुळे या भाविकांना पायी चालत येण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तसेच दर्शनानंतर या भाविकांना आपल्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी बसस्थानकावरही पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. व रा. प. परिवहन महामंडळाकडूनही जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
पावसाने भाविकांची तारांबळ, फेरीवाल्यांची ही धावपळ
आज तुळजापूरात लाखोंच्या संख्येने भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. मात्र दुपारी आचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने भाविकांची प्रचंड तारांबळ उडविली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भाविकांना आसरा शोधावा लागला. सुमारे अर्धातास जोरदार पाऊस आल्याने शहरातील गटारींना लगेचच तळ्याचे स्वरुप आले. तसेच रस्त्यावर असलेल्या फेरीवाल्यांचे ही या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांचीही एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहवयास मिळत होते.
 
Top