बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) सर्वसामान्याचे जीवनमान उंचवावे म्हणून 1986 साली ढाळे पिंपळगांव धरणाचे भूमीपूजनाचे काम केले असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी केले. यावेळी  माजी सरपंच आण्णासाहेब कोंढारे, जीवन गावडे, सुधीर सवणे, आण्णा कोंढारे, विनायक कोंढारे, मुसा शेख, याकुब शेख, सुंदरभाई सुतार, मरिआप्पा तुपेरे, संतोष दळवी आदी उपस्थित होते.
    वैराग भागातील साठवण तलावाला मंजूरी आणि निधी मिळविला कॅनॉलमधून एक फाटा ढाळेपिंपळगावाच्या धरणात सोडण्यासाठी मंजूरी मिळवलेली आहे. पुढील अनेक पिढयांचे भले करण्यासाठी 2004 साली धरणाचे काम मी पूर्ण केले. स्वप्नवत वाटणारी ही उजनीच्या पाण्याची योजना मार्गी लावली आणि बार्शी तालुक्यात शेतीसाठी उजनीचे पाणी आणले.
    पाचशे एकर मिळविण्याचा जर तुमचा उद्योग असेल तर आणखी पाचशे एकर मिळवा परंतु लोकसभेचे काम सोडून द्यावे असा सल्ला विरोधकांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप सोपल यांनी खामगांवच्या सभेत दिला. यावेळी सोपल बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन मुठाळ, सुरेश नलगे, प्रभाकर डमरे, शिवाजी गायकवाड, नागेश अक्कलकोटे, युवराज काटे, कमलाकर पाटील, नंदकुमार काशिद, योगेशजी सोपल, विलास रेणके, गणेश जाधव, सौ. मंगलताई शेळवणे, मंदाताई काळे, करुणाताई हिंगमीरे आदी उपस्थित होते. घोळवेवाडी , काटेगांव पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या आहेत. गोरमाळेसाठी एस.टी.ची सोय केली, चिखर्डे, खांमगांवाल पाणीपुरवठा योजना पूर्ण केली. या गावाने मला नेहमीच लेकरासारखे जपले आहे. विरोधकर राजस्थानी लोटयासारखे आहेत. त्या लोटयाल बुड नसते कधी इकडे पडतो तर कधी तिकडे पडतो. एकाच पक्षावर जास्त दिवस निष्ठा ठेवत नाही. मराठा आरक्षण दिले जावे असे एकमुखाने निर्णय झाला आहे. मंत्रीगटाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. तालुक्यातील मतदार आपल्याला पुण्याला नाहीतर मुंबईला पाठवणार आहेत. पुढे अक्कलकोटे म्हणाले, बाजारात मेथी घेताना पारखून मेथीची पेंढी घेतो तसेच तालुक्याचा लोकप्रतिनिधी निवडताना पारखून निवडले पाहिजे. विरोधकांनी शरीरावर हल्ला केला परंतु सोपलप्रेमी विचारावर हल्ले करु शकत नाहीत.
 
Top