उस्मानाबाद - जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई पोलीस अधीनियम 1951 च कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी हे आदेश जारी केले असून त्यानुसार शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या व्यक्तीखेरीज कोणत्याही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर किंवा जवळपास कोणतीही शस्त्रे व तत्सम वस्तू, कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके बाळगता येणार नाहीत.  आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत तसेच सभ्यता व नितीमत्तेस बाधा येईल, अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही.  जाहीरपणे प्रक्षोभक व असभ्य वर्तणूक करता येणार नाही. याशिवाय एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास  किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.  या कालावधीत मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार हे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. शासकीय कामवरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत.   दि. 30 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 13 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील. 
 
Top