उस्मानाबाद -  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी रविवारी सायंकाळी अचानक शहरातील ख्वाजानगर भागास भेट दिली तसेच नगरपालिका शाळा क्रं.14 या मतदान केंद्रास भेट दिली. मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, याबाबत जागृतीही केली. 
निवडणूक यंत्रणेमार्फत बीएलओमार्फत पोलचिठ्ठी वाटप करण्यात येत आहे. त्याचाही आढावा डॉ. नारनवरे यांनी घेतला. निवडणूक यंत्रणा गतीने काम करताना दिसली पाहिजे, अशा सूचना यापूर्वी डॉ. नारनवरे यांनी दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी होतेय किंवाननाही, हे पाहण्यासाठी स्वता डॉ. नारनवरे यांनी आज थेट ख्वाजानगर गाठले. तेथील नागरिकांशी संवाद साधून मतदारयादीत नाव आहे का, त्याची खातरजमा केली आहे का, अशी विचारणा केली. 
त्यानंतर त्यांनी नगरपालिका शाळा क्र. 14 येथे भेट देऊन तेथील मतदानकेंद्रांच्या सुविधांचा आढावा घेतला. मतदारांसाठीच्या आवश्यक सुविधा मतदानकेंद्रांवर पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.                           

 
Top