नळदुर्ग - तुळजापूर विधानसभ मतदार संघातील कॉग्रेसचे उमेदवार माजी पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या प्राचार्थ अभिजीत बाबुराव  चव्हाण यांच्‍या नेतृत्‍वाखाली  नळदुर्ग येथील  इंदिरा नगर व व्यासनगरसह शहरात पदयात्रा काढण्‍यात आली.  पदयात्रा व कोपरा बैठकीस मतदाराचा  प्रतिसाद मिळत आहे.
       
या पदयात्रेत  नगराध्‍यक्षा मंगल सुरवसे , नगरसेवक नितीन कासार , शब्‍बीरआली सावकार , शहबाज काझी, नगरसेवीका सौ. लक्षमी खारवे, अमर भाळे, संजय दळवी, सुधीर हजारे, बसवराज धरणे,   सचिन गायकवाड, उध्‍दव सुरवसे, संदीप सुरवसे, शाहेदाबी सय्यद , कल्‍पना गायकवाड, यांच्‍यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.  
 
Top