संग्रहित फोटो
पांगरी (गणेश गोडसे) अलीकडील काळात माणसाकडून होत असलेल्या वृक्षतोडिमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून त्यामुळे वन्य प्राणी व पर्यायाने माणसांचे मोठे नुकसान होत असून हे थांबणे काळाची गरज असल्यामुळे निसर्ग संर्धंनासाठी प्रत्येकांनी किमान एक तरी झाड लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पांगरी विभागाचे वन रक्षक राजू शेळके यांनी केले.ते उक्कडगाव ता.बार्शी येथे वन्य जीव सप्ताहानिमित आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.
    शेळके पुढे बोलताना म्हणाले की सोलापूरचे उप- वनसंरक्षक सुभाष बडवे व बार्शीचे वनक्षेत्रपाल .आर.बी.धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी भागात वन्यजीव सप्ताहानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लोकांना वन्य प्राण्याप्रती आकर्षित करून मित्र बनवण्यासाठी वन खात्यातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत.यावेळी वनातील वाघ,हरिण,ससे,लांडगा,साप,गोणास,तरस,यासह सरपटणारे प्राणी यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
 राजाभाऊ जगदाळे यांनीही वृक्ष सवर्धन किती गरजेचे आहे हे सांगून त्याचे महत्व विषाद केले.यावेळी वन कर्मचारी प्रभाकर जानराव,रामचंद घोळवे,पांडुरंग बगाडे,चंद्रकांत ठोंबरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
 
Top