पांगरी( गणेश गोडसे)  विधानसभेसाठी मतदान  करण्याचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला आहे  तशी  प्रचार यंत्रनाही चांगलीच रंगात  आली असून नेतेमंडळी रात्रीचा दिवस करून मतदारांना आपलेस करून घेण्यासाठी प्रचार सभा,प्रचार फेर्‍या,रोड शो,कॉर्नर सभा आदींसह स्टार प्रचारकाना आपल्या प्रचारासाठी आणून तरुण,युवा मतदारांसह आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
  कामगारांचा भाव वधारला: निवडणुकीचे काही का होईना महिला मजूर,कामगार,बाल कामगार यांना मात्र सध्या सुगीचे दिवस आले आहेत.एरव्ही 150 रुपयावर दिवसभर काम करणार्‍या महिलेला निवडणूकामुळे दिवसाला 300 रुपये तर पुरूष यांना प्रतिदिन 500 रुपये रोकड मिळू लागली असून तीही दोन वेळेस चटकदार जेवणावर येथेछ् ताव मारून.अजून काही दिवस भाडोत्री कार्यकर्त्यांची चांदीच रहाणार आहे.
  मतदारांचे डोळे नेत्यांच्या दानाकडे: निवडूणुका नजीक आल्या असून सध्या कांही ठराविक कार्यकर्त्यांचीच चलती सुरू आहे.एकनिष्ट कार्यकर्ताही तोंड वासून तयार आहे.औदा आम्हीपण नाय सोडणार असा सुर उमटू लागला आहे.आमक्या नेत्याने प्रती मतदार 2 हजार तर पोस्टल मतासाठी 3 हजार रुपये असा दर काढला असल्याच्या चर्चेला उधाण आले असून मतदारकडून घरातील मतदार व येणारी रक्कम याची गोला बेरीज घालून दिवाळीचे गोड स्वप्न बघितले जात आहे.मतदारला उमेदवाराकडून मतदानाच्या बदल्यात काही दान मिळणार की ही अफवाच रहाणार हे येणार्‍या कांही दिवसातच स्पस्ट होणार आहे.एक गोष्ट  मात्र नक्की की या निवडणुका बहुरंगी होत असल्यामुळे मतदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.निवडणुका जश्या जवळ येत आहेत तश्या मतदारांच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या आहेत.
  किरकोळ नेत्यांनाही आर्थिक प्रलोभने: सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला असल्यामुळे गावा गावात व वाड्या वस्त्यावर असलेल्या किरकोळ व सटर -फटर नेत्यांनाही निवडणुकीपूरता का होईना मस्का पॉलिश करणे उमेदवारणा भाग पडत आहे.किरकोळ नेतेही यावेळी चांगलाच भाव घेत आसल्याचे दिसत आहे.आम्ही राजकारण बंद केलय,तुमच्यामुळे आम्हाला येवढा फटका बसला,आमची खूप मोठी आर्थिक हानी झाली,घर जाळून तुमच्यासाठी लढलो,मतासाठीच आमची आठवण आली काय, अशी अनेक कारणे सांगून स्थानिक नेते उमेदवारांना पिटाळून लावत आहेत किव्हा भेट टाळत आहेत.त्यामुळे मनधरणी करता करता नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
नवमतदार निर्णायक: नव्याने मतदान प्रकिर्येत सहभागी होत असलेला  युवा मतदार या निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावणार यावरच होऊ घातलेल्या निवडणुकीतील उमेदवारचे भवितव्य अवलंबून आहे.
जेवणावळी झडू लागल्या: अटीतटीच्या लढती होत असल्यामुळे एका एका मताची जुळवणी उमेदवार स्वत: जातीने करू लागले असून कार्यकर्ते बोकडाचे बळी देऊन मतांचा आलेख वाढवू पहाट असल्याचे दृश्य आहे.मांसाहारी जेवणाच्या पंगतीसाह कार्यकर्ते हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेऊ लागले असल्यामुळे धाबे,हॉटेल्स,आदिना चांगले दिवस आले आहेत.मात्र त्यातही रंगात बेरंग असा प्रकार होऊ लागले आहेत.रंगीत पोटात गेल्यावर अंतर्मनातला खरा रंग बाहेर पडत असल्यामुळे हॉटेल,धाबे या ठिकाणी जोवणासाठी मिळून गेलेल्या कार्यक्रतांची हमरी तुमरी होऊन भांडणे होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
 निवडणूक निरक्षकांच्या डोळ्यात धूळफेक: सगळीकडेच ताटली,बाटली,यासह इतर गोस्ठींचा उन्माद सुर होऊनही निवडणूक आयोगाचे निरीक्षक नेमकी कोणती ड्यूटी बजावत आहेत असा प्रशन सर्वसामान्यामधून विचारला जात आहे.निवडणूक अधिकार्‍यांना या गोसठि दिसत नाहीत का अशी चर्चा होत आहे.
  पैसे सापडल्याच्या फक्त चर्चाच : सध्या सगळीकडेच कोटीने पैसे सापडल्याच्या बातम्या झळकत आहेत.मात्र लगेच दुसर्‍याच दिवशी सापडलेली रक्कम ही आमुक बँकेची,तमुक कारखान्याची,अशा घटना कानावर पडतात.म्हणजे सध्या सुरू असलेल्या राज्यकर्त्याच्या पैश्यांच्या महापुरातील एकही रक्कम पोलिसांना मिळून आलेली नाही हे दुर्दैव असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.
 
Top