उस्मानाबाद - विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०१४ अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. उमरगा मतदार संघातील  लोहारा येथे तर तुळजापूर मतदार संघात तुळजापूर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.निवडणूक निरीक्षकांच्या उपसिथातीत तुळजापूरात जनजागृती करण्यात आली.         
        लोहारा येथे विविध कार्यक्रमांचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वा शिवाजी चौक, लोहारा येथुन मोटारसायकल रॅली काढण्‍यात आली. रॅलीचा शुभारंभ लोहारा तहसीलदार श्रीमती ज्‍योती चौहान व गटशिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखवुन केला. रॅलीमध्‍ये गटविकास अधिकारी श्री.शिवदे एस.जी, पोलिस निरिक्षक श्री.भिमाळे, नायब तहसीलदार मुस्‍तफा खोंदे यांचेसह शहरातील तरुण मोटार सायकलस्‍वार सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप तहसील कार्यालय, लोहारा येथे करण्‍यात आला.
त्‍यानंतर तहसील कार्यालय, लोहारा येथे हुसेन शेख, उंडरगाव व त्‍याचे सहकारी यांनी भारुडाच्‍या माध्‍यमातुन मतदानाचे महत्‍व तालुक्‍यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्‍या व जनतेस सांगितले. यावेळी तहसीलदार श्रीमती चौहान यांनी संकल्‍प पत्राचे वाचन केले व उपस्थितीनां मतदान करण्‍याबाबत शपथ दिली.
 त्‍यानंतर सकाळी ११ वाजता अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्‍याची मतदार जनजागृती रॅली काढण्‍यात आली. रॅलीचा प्रारंभ तहसील कार्यालय लोहारा येथे होवून समारोप हायस्‍कुल लोहारा या विद्यालयाच्‍या प्रांगणात करण्‍यात आला.तसेच जेवळी येथे दुपारी १ वाजता शालेय विद्यार्थी व ग्रामस्‍थांची रॅली काढण्‍यात आली. रॅलीची सुरुवात बसवेश्‍वर हायस्‍कुल, जेवळी येथुन झाली व समारोप बसवेश्‍वर चौक, जेवळी येथे करण्‍यात आला. तेथे मतदार जनजागृती बाबत बालाजी मक्‍तेदार, व्‍यंकट पोतदार, श्रीमती वनिता पिचे यांनी पथनाट्य सादर केले त्‍यानंतर तहसीलदार श्रीमती चौहान यांनी संकल्‍प पत्राचे वाचन करुन उपस्थितांना मतदान करण्‍याबाबत शपथ दिली.
दु.२ वा.जेवळी येथे मतदारांना मतदार चिट्टीचे वाटप करण्‍यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्‍वरुपात मतदारांना तहसीलदार श्रीमती चौहान, यांच्‍या हस्‍ते मतदार चिट्टीचे वाटप करण्‍यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शिवदे एस.जी., नायब तहसीलदार (निवडणुक) श्री. मुस्‍तफा खोंदे,श्री.कांबळे डि.एम,, श्री.मागाडे ,अतिरिक्‍त. ग.वि.अ. लोहारा, मंडळाधिकारी व सर्व तलाठी उपस्थित होते.  
 
Top