तुळजापूर :- तुळजापूर विधानसभा मतदार संघातून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुक लढवित असलेले देवानंद रोचकरी यांनी शेतकरी कामगार पक्षाचा ए.बी. फॉर्म स्वत: जवळ ठेवून व पक्षाची उमेदवारी माघारी घेतल्याने या निवडणुकीत शेकापचा उमेदवार न राहिल्याने रोचकरी यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्‍यात आली आहे.
दि. ४ रोजी शे.का.प. चे तालुका चिटणीस मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रकाशराव देशमुख, अंगत सलगर, किरण खपले, प्रा. काकासाहेब शिंदे, उत्तम अमृतराव उपस्थित होते. यावेळी या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पक्षाचा पाठिंबा द्यायचा या निर्णयासाठी दि. ९ गुरुवारी रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे श्रेयस कुतवळ यांनी सांगीतले. यावेळी विलास वेदपाठक, संभाजी लोंढे, विष्णूपंत सोनवणे, बापूसाहेब भोसले, शंकरराव गायकवाड, विठ्ठल माने, सुभाष गायकवाड, सुहास गायकवाड आदीसह कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. 
 
Top