उस्मानाबाद - वादी-प्रतिवादी, पक्षकारांचे आर्थीक, सामाजिक हित लघात घेवून  व पक्षकारांचे  दु:ख निवारण्यासाठी विधीज्ञ मंडळीनी न्यायालयात  अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्याच्या  कामी योगदान दयावे, असे आवाहन  उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती तथा पालक न्यायमुर्ती  एम. टी. जोशी यांनी  केले.   
       येथील जिल्हा व सत्र न्यायालय, परिसरात न्याय सेवा सदन या प्रस्तावीत इमारतीचे भूमीपूजन  न्यायमुर्ती श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना केले.
    याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र तावडे, जिल्हा न्यायाधिश वर्ग-1 एस.आय.पठाण, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. एस. लोमटे, सरकारी वकील ॲड शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एस. पाटील यांच्यासह जिल्हयातील न्यायाधिश, जेष्‍ठ विधीज्ञ, विधीज्ञ मंडळाचे सदस्य, वकील वर्ग, न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते
             न्यायमुर्ती श्री. जोशी पुढे म्हणाले की,  पुर्वीकाळी राजेशाही अस्तित्वात होती. ईर्षा व जिद्दीमुळे युध्द रणांगणात होत असत. या युध्दामुळे मोठया प्रमाणात मनुष्य, व वित्तहानी होत असे, त्या युध्दाचा परिणाम समाजावर कळत-नकळत होत असल्याने  भविष्यात होणारी हानी  टाळावी, समाजात एकोपा व  शांतता रहावी, पक्षकारांचे पैसा वेळ वाचावे आणि त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  प्रतीष्ठीतांनी वादी-प्रदीवादीच्या समंती/ सामोपचाराने  त्यांच्यातील मतभेद, वाद आपसात गावातच लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटवून त्यात दोघांच्या हिताचा निवाडा देत असल्यामुळेच  लोकन्यालयाची चळवळ यशस्वी  होत असल्याचे न्यायमुर्ती श्री. जोशी यांनी सांगितले.
    न्या. तावडे यांनी जिल्हयात लोकन्यायालये यशस्वी करण्यासाठी  वकील, विधीज्ञ मंडळाचे सहकार्य मिळाल्याने प्रलंबित प्रकरणे झपाटयाने निकाली निघत असल्याची माहिती दिली.  बांधण्यात येणाऱ्या सेवा सदनावर सुमारे 95 लाख रुपये खर्च येणार असून ही वास्तू येत्या 6 महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती  दिली.
            जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. एस. लोमटे यांनी न्याय सेवा सदनामुळे उस्मानाबाद जिल्हयाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  न्यायाधिश (वरीष्ठस्तर) देशमुख ओंकार यांनी करुन शेवटी सर्वांचे आभार मानले.
 
 
Top