बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर)   लोकाभिमुख कामे केली आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, सबस्टेशन, ट्रान्सफार्मर, मृदूसंधारण, पाणलोट क्षेत्र साठवण तलाव बंधारे, खरेदी केंद्र या माध्यमातून बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप सोपल यांनी तुळजापूर रोड, भिम नगर येथील प्रचार सभेत केले.
   यावेळी नगराध्यक्ष रमेश पाटील, डी.एन. देशमुख, शहराध्यक्ष तानाजी मांगडे, हरीभाऊ पाटील राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, विक्रम सावळे, हरीभाऊ कोळेकर, अब्बासभाई शेख, श्री अय्यर, नरेंद्र नलावडे, सुरेश बोकेफोडे, दत्ता आण्णा शिंदे, बाबा साळुंखे, साधना कांबळे, अस्मिता लंकेश्वर, विजया बंगाळे, नवनाथ चांदणे, अविनाश गायकवाड, विवेक गजशिव, संदीपान कांबळे आदी उपस्थित होते.
    सोपल म्हणाले, उथळ पाण्याला खळखळाट फार असे उथळ पाणी म्हणजे आपले विरोधक आहेत. तीन हजार तरुणांना नोकरी दिली आणखीन 15 हजार तरुणांना नौकरी लावतो अशी भुल विरोधक देतात. तुळशीदास जाधव, प्रभाताई झाडबुके, किसनराव देशमुख, शितोळेताई या बार्शीच्या लोकप्रतिनीधींनी तालुक्याला लक्षात राहणारी कामे केली आहेत. या तालुक्याने मला आत्तापर्यंन चार वेळेस निवडणून दिले आहे. आणि एक वेळेस नाकारले परंतु विरोधकांना एकदा संधी दिल्यानंतर दुसर्‍यांदा नापास केलेले आहे.
    भिम नगर येथील प्रचार सभेत सोपल म्हणाले, 1994 साली मराठवाडा विद्यापिठाच्या संबंधी आमदार म्हणून मी मतदान केलेले आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाडा विद्यापिठाला नाव देण्यासाठी माझाही खारीचा वाटा आहे. रमाई घरकुल योजनेतून 1 हजार कुटूंबाना घरकुल देण्यात आले आहेत. त्या पुढील काळात आणखी एक हजार कुटूंबाना घरकुल देण्यात येईल. धार्मीक द्वेषाने पछाडलेली कडवा जातीवाद करणारी काही पक्ष आहे. डयुप्लीकेट व्यक्ती आणून प्रचार करतात. आशा या डयुप्लीकेट उमेदवारांना मते मिळणार नाहीत. या तालुक्यातील 40 हजार एकर शेती पाण्याखाली येणार आहे. उद्योग धंद्दे निर्माण होत आहेत. त्यातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. चौकट:-     राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले महाराष्ट्र प्रदेश वंझारी समाज सेवा संघाचे तालुका अध्यक्ष धनंजय मुंढे, अनिल तांबे, चव्हाण, तोडकरी, कांबळे, तसेच मुस्लीम समाज मांगडे चाळ येथील सहरा ग्रुप यांचा सोपल यांनी सत्कार केला. 
 
Top