नळदुर्ग -  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांच्या प्रचारार्थ ११ ऑक्‍टोंबर रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा तुळजापूर येथे होणार असल्याची माहिती मनसेचे मराठवाडा विभागीय सरचिटणीस एस.के.जागीरदार यांनी दिली.
     
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा राजकीय ज्वर वाढला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आदी प्रमुख नेत्यांच्या सभा तुळजापूरात झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दि.१२ ऑक्‍टोंबर रोजी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांच्या प्रचारार्थ मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची दि.११ ऑक्‍टोबर रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांनी मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला आहे. पदयात्रा, कार्नर सभा, जाहीर सभा आदींच्या माध्यमातून मतदार संघ ढवळून काढला आहे. मतदार संघातील इतर पक्षातील असंख्य तरूण दाखल होत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी आणखी कांही कार्यकर्ते मनसेत दाखल होणार आहेत. मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांच्या विजयासाठी व सभेच्या तयारीसाठी मनसेचे मराठवाडा विभागीय सरचिटणीस एस.के.जागीरदार, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, नळदुर्ग शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष रमेश घोडके, अरूण जाधव, तालुकाध्यक्ष तानाजी खलाटे, देवराज युवामंचचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जांबळे, तालुका अध्यक्ष महंतेश पाटील, तालुका संघटक पांडुरंग बोंगरगे, मल्लिकार्जुन कुंभार, बशिर शेख आदींची उपस्थित राहणार आहे.
 
Top