उस्मानाबाद - सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर रोजी)  राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. रन फॉर युनीटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य या विषयावर चर्चासत्र, पोलीस परेड आदींचे  यांचे  आयोजन करण्याबाबत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
    सकाळी 7 वाजता रन फॉर युनीटी या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद नगरपालिकेला त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छता अभियान मोहिम, दौडच्या वेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, नगर परिषद शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थित राहणे, या दौडच्या कालावधीत शासकीय यंत्रणेसोबत सामाजिक संघटना, एनसीसी, एनएसएस स्काऊट गाईड आणि नागरिकांचा सहभागाबात आवश्यक ते पावले उचलण्याबाबतसूचना देण्यात आल्या आहेत.  याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळे, रमजान मंडळे, आंबेडकर जयंती मंडळे, शिवजयंती मंडळे, महिला बचत गट तसेच इतर सर्व संघटना  आदींनी सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी आयोजित स्थळी  उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड हे या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
सकाळी  10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी 5 वाजून 30 मिनीटांनी पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस परेड, मानवी साखळीचे आयोजन यामध्ये शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना वरील वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे उपस्थित रहावयाचे आहे.
वरील सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
Top