उस्‍मानाबाद - मुंबई  दारुबंदी कायदा 1949 मधील नियम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना प्राप्त अधिकारान्वये जिल्हयात  विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पाडता याव्यात, म्हणून मंगळवार, दि. 14 ऑक्टोबरचा संपूर्ण दिवस व बुधवार,  दि. 15 ऑक्टोंबर रोजी मतदान असल्याने संध्याकाळी 7 वाजेपर्यत, तसेच मतमोजणी  दि. 19 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी असल्याने संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व देशी दारु दुकाने/ परवानाकक्ष अनुज्ञप्ती / एफबार-2 / बिअर /ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी  केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची संबधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले  आहे.
 
Top