उस्मानाबाद :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 यामध्ये 240 (अ.जा.) उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले, 241-तुळजापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, 242- उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील आणि परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल मोटे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले.
      उमरगा मतदारसंघातून चौगुले यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय  कॉंग्रेसचे उमेदवार किसन कांबळे यांचा 20 हजार 442 मतांनी पराभव केला. तुळजापूर मतदारसंघातून श्री. चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांचा 29 हजार 610 मतानी पराभव केला. उस्मानाबाद मतदारसंघात राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा 10 हजार 806 मतांनी पराभव केला. परंडा मतदारसंघात राहुल मोटे यांनी शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा 12 हजार 389 मतांनी पराभव केला.
    आज सकाळी आठ वाजता चारही मतदारसंघात मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. दुसरीकडे ईव्हीएम यंत्रांद्वारे मतमोजणीस प्रारंभ झाला. साधारणता अर्ध्या तासातच पहिला फेरीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही वेळाच्या अंतराने फेरीनिहाय निकाल येण्यास सुरुवात झाली.
      उमरगा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे किसन कांबळे यांना 363 टपाली मतांसह एकूण 44 हजार 736 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे 588 टपाली मतासह 65 हजार 178 मते मिळवून विजयी झाले.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संजय गायकवाड यांना  15 हजार 569, दत्ता गायकवाड (बसपा)-1675, प्रा. विजय क्षीरसागर (मनसे)-1459, कैलास शिंदे (भाजप)-30,521, चंद्रकांत थोरात (भारतीय नौजवान सेना /पक्ष)- 421 आणि विद्या वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांना 183 मते मिळाली. उमरग्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र गुरव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष जीवनराव गोरे यांचा 29 हजार 610 मतांनी पराभव केला. तुळजापूर  मतदारसंघात एकूण 2 लाख 17 हजार 408 मतदारांनी मतदान केले.  त्यातील नोटाला 1314 मते मिळाली. 6 मते बाद झाली. श्री. चव्हाण यांनी 70 हजार 701 मते प्राप्त करुन विजय मिळवला. जीवनराव गोरे यांना 41 हजार 91, प्रेमानंद डोरनाळीकर (बसपा) यांना 2 हजार 405, देवानंद रोचकरी (मनसे) – 35, 895, संजय निंबाळकर (भाजप)- 36, 380, सुधीर पाटील (शिवसेना) – 24 हजार 991, सतीश कसबे (महाराष्ट्र विकास आघाडी)- 893 आणि राहुल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी)-385 अशी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. घुगे यांनी मधुकरराव चव्हाण विजयी झाल्याचे घोषित केले.
      उस्मानाबाद मतदारसंघात सर्वाधीक 20 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी 88 हजार 469 मते प्राप्त करुन विजय मिळवला.  त्यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना- 77 हजार 663 मते) यांचा पराभव केला.  भाजपचे संजय पाटील दूधगावकर यांनी 26 हजार 81 मते मिळवली. बसपाचे जयराम घुले यांनी 2 हजार 531, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे विश्वास शिंदे यांनी 9 हजार 81, मनसेचे संजयकुमार यादव यांनी 644, ऑल इंडिया एमआयएम यांना 4 हजार 555, रिपब्लिकन बहुजन सेनेचे अनिल हजारे यांना 654, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेश भालेराव यांना 223, धनंजय तरकसे  (हिंदुस्थान निर्माण दल)-148, मधुकर गायकवाड (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)-283 आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रमेश बनसोडे यांनी 195 मते मिळविली. याशिवाय आठ अपक्षही निवडणूक रिंगणात होते. उस्मानाबाद मतदारसंघात 621 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
     जिल्ह्यात सर्वांत प्रथम परंडा मतदारसंघाचा निकाल घोषित करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी झाल्याचे घोषित केले. परंडा मतदारसंघात केवळ 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.  राहुल मोटे यांना 78 हजार 548 मते मिळाली.  शिवसेनेचे  ज्ञानेश्वर पाटील यांना 66 हजार 159, बसपाच्या संगीचा आगवणे यांना 1 हजार 256, मनसेचे गणेश दत्तात्रय शेडगे यांना 2 हजार 426, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नुरुद्दीन चौधरी यांना 7 हजार 760 मते मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळासाहेब पाटील यांना 37 हजार 324 मते मिळाली.  हिंदुस्थान जनता पार्टीचे त्रिंबक राजगुरु यांना 695 मते मिळाली.  एकूण 1 लाख 97 हजार 108 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  
 
Top