नळदुर्ग -: येडोळा (ता. तुळजापूर) येथे 58 व्‍या धमचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्‍यात आला.  
   याप्रसंगी येथील युवा कार्यकर्ते देवानंद लोंढे, प्रविण कांबळे व अंकुश लोंढे यांच्‍या हस्‍ते तथागत महात्‍मा गौतम बुध्‍द व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रति‍मेचे पुजन करून सामुदायिकरित्‍या बुध्‍द वंदना घेण्‍यात आली. याप्रसंगी धर्मवीर लोंढे, निलम लोंढे, साक्षी लोंढे, सह यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. त्‍याचबरोबर  समाज प्रबोधनपर भिमगीत गायणाच्‍या कार्यक्रम पार पडले. यावेळी अजित लोंढे, राम लोंढे, व्‍यंकट लोंढे, लक्ष्‍मण लोंढे, अमित लोंढे, रवि कांबळे, कैलास गवळी , सनराज बनसोडे, राहुल लोंढे, अतुल लोंढे, महेश लोंढे, मारूती लोंढे, भानुदास लोंढे, अनिल लोंढे,  शालुबाई लोंढे, सुवर्णा लोंढे आदीजण उपस्थित होते.
   वागदरी ता.तुळजापूर येथे धम्‍मचक्र प्रवर्तन दिन उत्‍सहाने साजरा करण्‍यात आला. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ धाडवे  यांच्‍या हस्‍ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा गौतम बुध्‍द यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिक रित्‍या बुध्‍द वंदना संपन्‍न झाली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्‍यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  एस.के. गायकवाड यांनी केले. यावेळी कुंडलिक वाघमारे, कल्‍लाप्‍पा वाघमारे, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, गामपंचायत सदस्‍य  कविता गायकवाड, गिताबाई झेंडारे, सुशिलाबाई वाघमारे, ठकूबाई वाघमारे, उज्‍वला वाघमारे आदीजण उपस्थित होते. 

 
Top