उस्मानाबाद - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कल्पकतेने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 तुळजापूर विधानसभा मतदार संघ-241 अंतर्गत स्वीप-2 कार्यक्‌रमातंर्गत  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    तुळजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी घुगे एस.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांत जनजागृतीसाठी व्हावी, यासाठी तुळजापूर तालुक्यात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. 206 शाळेतील 50 हजार 878 विद्यार्थी व 1 हजार 411 शिक्षक सहभागी झाले होते. तुळजापूर शहरातून भव्यरॅली  काढण्यात आली. यात 16 शाळेतील 3 हजार 240 विद्यार्थी व 253 शिक्षक सहभागी सहभागी झाले होते. याशिवाय 11 वी 12 वीच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली होती. यात  3 हजार 250 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. नळदुर्ग येथे सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत 225 विद्यार्थी व 35 शिक्षक सहभागी  झाले होते.
      जनजागृतीनिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. या  206 शाळामधून 2 हजार 730 विद्यार्थी सहभागी झाले. वक्तृत्व स्पर्धेत 206 शाळेतून 1 हजार 722 विद्यार्थी सहभागी झाले होते. तुळजापूर शहरातील 11 शाळेतून निवडक 33 स्पर्धक सहभागी  झाले होते. पाच महाविद्यालयात संकल्प पत्र व प्रतिज्ञापत्राचे वाचन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 4 हजार 739 विद्यार्थी सहभागी  झाले होते.
     गावपातळीवर मतदान जनजागृतीसंदर्भात महिला बचत गटाचा कार्यक्‌रम घेण्यात आला. अंगणवाडी सेवीकेसाठी कॅम्प आयोजन करण्यात आले होते. यात 5 हजार 852 सहभागी  झाले. वेगवेगळया संघटना, वकील संघटना, रोटरी क्लब, हाऊसिंग सोसायटी, मजूर संस्था आदिंच्या बैठका घेवून मतदार जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या तालुक्यात सहयाची धडक मोहिम राबविण्यात आली. यात 12 हजार 730 मतदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
            शिवाय 5 घंटा गाडयामार्फत मतदारांना प्रबोधन करण्यात येत आहे. मतदान कसे करावे याबाबत ईव्हीएमचे प्रात्यक्षिक कॅम्प  मोर्डा, तुळजापूर खुर्द, केशेगाववाडी, बामणी, बामणी, खंडाळा, काक्रंबा, तुळजापूर शहर एकुण 150 गावातून प्रात्यक्षिक करुन  दाखविण्यात आली. तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवकांच्या बैठका व  बी.एल. ओ च्या बैठका घेण्यात आल्या.  तसेच 150 गावात कलापथाचे कार्यक्‌रम घेण्यात आले.
    फिरता मतदान जनजागृती रथ तयार करुन गावोगावी मतदार जनजागृती  करण्यात येत आहे. 50 टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या गावात मतदार जनजागृती 20 गावातून करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील 23 गावातून 1 हजार 13 शेतकऱ्यांचे शेतकरी मेळावा आयोजित करुन  मतदान जनजागृती करण्यात आली आहे. मतदार जनजागृती मोहिम यशस्वीतेसाठी तहसीलदार श्री. पाटील, श्री.काटकर, कक्ष प्रमुख कल्याण सोनवणे व सहा. विभाग प्रमुख शिवाजी वेदपाठक, व्ही. आर. कागदे, एस. एस. गायकवाड, बी. आर. शिंदे, आणि बी. आर. खुरुद आदि अधिकारी व कर्मचारी, परिश्रम घेतले.
 
Top