उस्मानाबाद - जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत मतदारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर अकरा पुरावे ग्राहय धरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मतदानासाठी येताना मतदारांना यापैकी एक पुरावा (छायाचित्र असलेला) सोबत घेऊन येऊन मतदानाचा हक्क बजावावा.
    दरम्यान निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान न करता परत जावे लागू नये, यासाठी इतर अकरा पुरावे ग्राह्य धरण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
    यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, राज्य किंवा केंद्र सरकार,सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक लि. कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे छायाचित्र ओळखपत्र, बँक, पोस्ट ऑफिस यांच्याद्वारे दिले जाणारे छायाचित्र असणारे पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्टकार्ड, हमी योजनेचे जॉबकार्ड, श्रम मंत्रालय योजनेतंर्गत दिले जाणारे स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असणारे सेवानिवृत्ती वेतनाचे कागद, निवडणूक यंत्रणेकडून दिली जाणारी मतदार चिठ्ठी आदींचा समावेश आहे.
    उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदारांनी वरीलपैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र मतदानाच्या वेळी सोबत आणावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
 
Top