उस्मानाबाद -  उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू बोधवड व तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आदिनी या प्रशिक्षणात  मतदान यंत्राची  माहिती दिली.
आजच्या प्रशिक्षणात  पोस्टल मतदानासाठी पोस्टल मतदान सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली होती. श्री.बोधवड यांनी पोस्टल मतदान सुविधा कक्षाचा  मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मतदानावेळी घ्यावयाची काळजी बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. निवडणुक विषयक कामे गांभीर्याने घ्या. कोणत्याही प्रकारे कामात हलगर्जीपणा करु नका तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार काम करा, असे त्यांनी सांगितले. उपस्थितांना ईव्हीएमचे  प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार  राजेश जाधव आदि उपस्थित होते.      

 
Top