नळदुर्ग -  प्रचाराच्‍या अंतीम टप्‍प्‍यात कॉंग्रेसच्‍या युवक कार्यकर्त्‍यांनी नळदुर्ग शहरात महामोटारसायकल रॅली काढून मोठे शक्‍ती प्रदर्शन करून सर्वांना अश्‍चर्याचा धक्‍का दिला. प्रचारामध्‍ये कॉंग्रेसने जोरदार आघाडी घेतली असून रॅलीमुळे विरोधकाचे धाबे दणाणले आहे..
    सोमवार दि. 13 आक्‍टोबर रोजी प्रचाराच्‍या तोफा थंडावणार म्‍हणून माजी पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या प्रचारानिमित्‍त दुपारी 1 वाजता नळदुर्ग शहर युवक कॉंग्रेच्‍या कार्यकर्त्‍यांनी शहरातील विविध प्रभागातून मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत जवळपास चारशे युवकांनी मोटारसायकलसह सहभागी झाले होते. वसंतनगर (नळदुर्ग) येथून रॅलीस सुरूवात झाली. ही रॅली वडार वाडा, इंदिरा नगर, व्‍यास नगर, व्‍यंकटेश नगर, ठाकरे नगर, रामलिला नगर, राष्‍ट्रीय महामार्गाने नानिमॉ दर्गा ते शास्‍त्री चौक, ब्राम्‍हण गल्‍ली,  धर्मवीर संभाजी चौक, मराठा गल्‍ली, काझी गल्‍ली, किल्‍ली गेट, क्रांती चौक, चावडी चौक, भिम नगर, शिवकरवाडी, बौध्‍द नगर, रहिम नगर,साठे नगर, यासह संपूर्ण शहरामधून रॅली काढण्‍यात आली. विरोधी उमेदवारांच्‍या प्रचारार्थ फिरत असलेल्‍या गाड्या क्षणभर थांबून विराट रॅली आश्‍चर्य चकित होवून हताशपणे पाहताना दिसून आले.
  या महारॅलीमध्‍ये कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते अभिजीत बाबूराव चव्‍हाण नगरसेवक इमाम शेख, शहबाज काझी, नितीन कासार, संजय दळवी, बसवराज धरणे, सुधीर हजारे,विनायक अहंकारी,नळदुर्ग शहराध्‍यक्ष नवाज काझी, रणजितसिंह ठाकूर, फुरखान शेख, सुनिल जाधव, अरूण नाईक, सौरभ गहेरवार, गोलू हजारे,मिठ्ठू ठाकूर, महेंद्र डुकरे, समीर सुरवसे, सुहास येडगे, अमर भाळे,मारूती खारवे, दिपक कांबळे,दादासाहेब बनसाडे, संदिप हजारे, सोमनाथ जाधव, प्रदिप पवार, सुरज ठाकूर, निजाम बागवान आदीसह जवळपास चारशे युवकांनी मोटारसायकलसह सहभागी झाले होते. या रॅलीचे ऐतिहासिक किल्‍ला गेट येथे विसर्जन करण्‍यात आले. यावेळी सर्वांचे विनायक अहंकारी यांनी आभार मानले.
   
 
Top