बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  बार्शी विधानसभा निवडणुक  करिता  तालुक्यात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. यातील चार प्रमुख पक्षातील शिवसेनेचे राजेंद्र राऊत, भाजपाचे राजेंद्र मिरगणे, राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, कॉंग्रेसचे सुधीर गाढवे यांच्याबाबत चर्चा सुरु असली तरी सोपल आणि राऊत यांच्यातच खरी लढत होत आहे.   
    निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राऊत, सोपल व मिरगणे यांनी शक्तीप्रदर्शन केले. या मध्ये मिरगणे यांना माणसे गोळा करता आली नसल्याने शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांच्या सभेला भगवंत मैदान येथे आणि दिलीप सोपल यांच्या सभेला जुना गांधी पुतळा चौक ते जुने पोलिस स्टेशन पर्यंत मोठी गर्दी होती. दूरपर्यंत दिसत नसल्याने सोपल यांच्या सभेत पांडे चौक पासून पुढे एलसीडी स्कीन बसविण्यात आल्या होत्या. राऊत व सोपल या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन शेवटची सभा घेतली. पोलिस प्रशासनातर्फे कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरिता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
    निवडणूकीतील प्रचारानंतर ज्याकरिता इतकी उठाठेव केली त्या मतदानासाठी नियोजन करण्याचे काम सर्व उमेदवारांनी सुरु केले आहे. दोन्ही उमेदवारांना आपणच निवडून येणार प्रचंड असा आत्मविश्वास दिसून येत आहे.
 
Top