बार्शी - भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र मिरगणे यांच्या ग्रामीण भागात केलेल्या प्रचारदौर्‍यात गावभेटी आणि पदयात्रांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गांवोगावी त्यांचे जल्लोषात भव्य स्वागत होत आहे. राजेंद्र मिरगणे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर पदयात्रा काढतात. ग्रामदैवताचे दर्शन घेतात. आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत गावाच्या सार्वजनिक समस्या समजून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ग्रामस्थांना गावातल्या समस्या सांगतात. तेंव्हा ग्रामस्थ आश्चर्यचकित होतात. आपल्या गावातील समस्यांचे पूर्णपणे आकलन झालेल्या नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे, हे त्यांच्या लक्षात येते. राजेंद्र मिरगणे त्यांना जर लोकप्रतिनिधी कार्यक्षमअसते आणि त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविली असती तर समस्या दूर झाल्या असत्या हे सांगतात. ग्रामस्थांना हे मनोमन पटते आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र मिरगणे यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे फलित आपल्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचलेले आहे. हे त्यांना माहित आहे. मिरगणे यांनी मोफत पाणीवाटप, मोफत बियाणेवाटप, मोफत नेत्रचिकित्सा आणि ज्येष्ठांना तीर्थयात्रा दर्शन या उपक्रमांतून ग्रामजीवन ढवळून काढलेले आहे. त्यामुळे प्रचारदौर्‍यात राजेंद्र मिरगणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांबरोबरच राजकारणापासून अलिप्त ग्रामस्थांचा मोठा समावेश असतो. आजपर्यंत सौंदरे, पानगांव, कांदलगाव, हिंगणी, राळेरास, जवळगांव, सर्जापूर, सुर्डी, मालवंडी, गुळपोळी, कव्हे, कोरफळे, साकत, कासारवाडी, बळेवाडी, भांडेगांव, काळेगांव, घाणेगांव, पिंपळगाव (देशमुख), ममदापूर, गोरमाळे, टोणेवाडी, झानपूर, ढेंबरेवाडी, चिंचोली, घोळवेवाडी, अशा अनेक गांवातून राजेंद्र मिरगणे यांनी धावत्या दौर्‍यात ग्रामस्थांशी संवाद साधला. राजेंद्र मिरगणे ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतात त्याचबरोबर मोठ्या गावात जाहीर सभा घेतात. तेंव्हा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा जणू मेळावाच भरतो. राजेंद्र मिरगणे त्यांना ग्रामविकासाचे महत्त्व सांगतात त्याचबरोबर गेल्या ६७ वर्षात आपल्याला सार्वजनिक रस्ते, शुद्ध पाणी, दर्जेदार शिक्षण, तत्पर आरोग्यसेवा, युवकांना नोकर्‍या आणि उद्योजक बनविण्यासाठी अनुकूल वातावरण, महिलांच्या स्वावलंबनातून आर्थिक विकास या गोष्टी मिळायला हव्या होत्या. परंतु राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे केवळ सत्ताकारणाच्या हव्यासामुळे स्वत:चे हित जपत स्वत:चा विकास साधत ग्रामीण जनतेला मात्र विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले गेले. हे समजून सांगण्यावर त्यांचा भर असतो. राजेंद्र मिरगणे यांच्या भाषणामध्ये मतदारांच्या प्रबोधनावर भर आहे. तालुक्याती सहकारी संस्थांच्या माध्यमातुन होणारी शेतकर्‍यांची अडवणूक तसेच उपसा सिंचन योजना रखडत पडल्यामुळे हरितक्रांती होण्यास निर्माण झालेले अडथळे तसेच सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार यांचे झालेले नुकसान यावर ते प्रकाशझोत टाकतात. केवळ शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा तात्विक मुद्दे मांडण्याची त्यांची पद्धत आहे. स्वत:च्या कष्टातून स्वत:च्या पायावर उभारलो आणि आपल्या कर्तृत्त्वातून मिळविलेल्या पैशातून मातृभूमीविषयी खरी आपुलकी असल्यामुळे सेवाकार्य केले. आपल्याला राजकारणाज कांही मिळवायचे नाही तर जनतेच्या भल्यासाठीच आपण राजकारण करतो आहोत, असे ते ठामपणे सांगतात. त्यामुळे राजेंद्र मिरगणे यांच्या भाषणांनाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
 
Top