उस्मानाबाद -  भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) रोशनलाल नेगी यांनी रविवारी जिल्हास्तरीय माध्यम कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यम सनियंत्रण व माध्यम प्रमाणीकरण कामाची पाहणी केली. तसेच वर्तमानपत्रांचे दैनंदिन अवलोकन केले जाते का, बातम्या व जाहिराती यांची पाहणी केली जाते का, याचीही माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मा. निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सुनील जाधव उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करुन मीडिया कक्षातील सर्व सहका-यांची  ओळख करुन दिली आणि संबंधित कर्मचारी करत असलेल्या कामांबाबतही माहिती दिली.
 
Top