उस्मानाबाद - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी  एसएसबी मुलाखतीचे पुर्वतयारीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त, कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे 6 ते 15 नोव्हेंबर,2014  या कालावधीत प्रशिक्षण वर्ग  घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्यद‍लात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलाखतीची संधी  मिळणार आहे. 
प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य सोय करण्यात आली आहे. भोजनासाठी प्रति दिवस रुपये 60 प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतिसह मुलाखतीस हजर रहावे.अधिक महितीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त, कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथील  कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 / 2451032 वर संपर्क साधावा.
कंबाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामीनेशन युपीएस अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामीनेशन युपीएस पास, सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी  पात्र झाले असावे, एन. सी. सी. (सी) सर्टिफिकेट अे/ बी ग्रेड धारक उमेदवारांने एनसीसी ग्रुप हेक्वार्टरनी शिफारस केल्याचे पत्र, टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर,युनिव्हरर्सीटी  एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर अथवा एस एस बी साठी  शिफारस केलेल्या यादीत नावे असावे.  एसएसबीकडून संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेवून येणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त सख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                              
 
Top