तुळजापूर : ना. मधुकरराव चव्हाण यांच्या झंझावती व नियोजनबध प्रचारामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघातील विरोधकांची धुळधान उडणार असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे. 
तुळजापूर विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा विजयी होण्यासाठी या मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार ना. मधुकरराव चव्हाण यांनी जोरदार तयारी केली आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसह भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्षाला सोड चिठ्ठी देत ना. चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे मतदार संघातून मधुकरराव चव्हाण हे विक्रमी मताने विजयी होण्याची शक्‍यता आहे. 
तुळजापूर मतदार मतदार संघात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेने प्रभावहिन व गेटकेन उमेदवार दिले आहेत. या तिनही पक्षाच्या उमेदवारांचा या मतदार संघाशी कुठलाच संबंध नाही अशा निष्क्रिय व गेटकेन उमेदवारामुळे या मतदार संघात कॉंग्रेसचा विजय जवळपास निश्‍चित मानला जात आहे. या मतदार संघात ज्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. त्या मंडळींची आगोदरच पत गेली असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ना. चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करीत आहेत. ना. चव्हाण यांनी केलेल्या विकास कामाची पावती देण्यासाठी तालु्नयातील मतदार मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहेत. सध्याच्या परिस्थितीत या मतदार संघात ना. मधुकरराव चव्हाण हे आघाडीवर आहेत. तुळजापूर तालु्क्‍याबरोबरच या मतदार संघाला जोडलेल्या ७२ गावातही ना. मधुकरराव चव्हाण हेच आघाडीवर असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
 
Top