उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा या चार विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळी 7 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज मतदान यंत्रे व अनुषंगीक साहित्यासह संबंधित मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. निवडणूक मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी झाली आहे. 
        या निवडणूकीसाठी चार मतदार संघात 100 पोलीस अधिकारी, 1 हजार 300 पोलीस कर्मचारी, 550 होमगार्डस आणि रेल्वे पोलीस, पंजाब पोलीस आणि एसआरपी यांच्या पाच कंपन्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत. चारही मतदार संघातील तयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. मतदारांनी निर्भीडपणे मतदानाचा  हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 
उमरगा विधानसभा मतदार संघात 2  लाख 81  हजार 689  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 50  हजार 929 पुरुष मतदार तर 1 लाख 30 हजार 760 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 4 मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघात 301  मतदान केंद्र आहेत.    तालुक्यात 33 मतदान केंद्रे संवेदनशील असून या केंद्रावरउमरगा व लोहाऱ्यासह वाढीव बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी  राहणार आहेत. लोहारा तालुक्यातील आरणी मतदान केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला आहे. 31 क्षेत्रीय  अधिकाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली असून मतदान कालावधी दरम्यान 650 कर्मचारी, 150 होमगार्ड, दोन पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक तैनात राहणार आहेत. मतदार संघातील साहित्य व कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्यासाठी  29  बसेस, 41 जीपसह इतर वाहनांची  व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष भरारी पथक, व्हीडीओ कॅमेरा चित्रीकरण पथक, विशेष पोलीस बंदोबस्त, आचार संहिता पथकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. शासनाकडून स्वीप-2 उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली असून यावर्षी 20 टक्यांनी मतदारात वाढ झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  रविंद्र गुरव यांनी सांगितले आहे. 
             तुळजापूर  विधानसभा मतदार संघात 3  लाख 30  हजार 156  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 78  हजार 515  पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 634 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 7 मतदार आहेत. 2 हजार 333 मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.  मतदान कर्मचारी (केंद्राध्यक्ष/सहा.केंद्राध्यक्ष/मतदान  अधिकारी) व पडदा नशिन मतदान केंद्रावरील कर्मचारी 1 हजार 677 (राखीवसह) , पोलीस  अ धिकारी व कर्मचारी 814, पोलीस पाटील व ग्रामसेवक 370, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) 370, मायक्रो ऑब्झवर्स 3, क्षे  त्रीय अ धिकारी व मास्टर ट्रेनर -80, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे  कार्यालयातील कर्मचारी-256, मतमोजणी  अधिकारी व कर्मचारी 202 असे एकूण कर्मचारी 3 हजार 772 आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 370 मतदान केंद्र आहेत. 3 केंद्र अति संवेदनशील घोषित करण्यात आली असून मायक्रो ऑब्झर्वर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदार संघात एकूण 11 गावामधील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर कायदा व सुव्यवस्था योग्य ती काळजीनिवडणूकविभाग व पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे.  शेवटच्या  चार दिवसांसाठी  भरारीपथकांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून  06‍सिथर सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. एकूण 36 क्षेत्रीय  अधिकारी यांना  आपल्या क्षेत्रात आदर्श सं हिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.     
  उस्मानाबाद विधानसभा संघात 3  लाख 26 हजार 384  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 74  हजार 981  पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 404 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 2 मतदार आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 347 मतदान केंद्र आहेत.          
          परंडा विधानसभा संघात 2  लाख 94 हजार 258  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 58  हजार 436  पुरुष मतदार तर 1 लाख 35 हजार 821  स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 1 मतदार आहेत. परंडा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत.          
जिल्ह्यात एकूण 12 लाख 32 हजार 490 मतदार असून 6 लाख 62 हजार 853 पुरुष, 5 लाख 69 हजार 623 स्त्री  आणि इतर 14 मतदार आहेत.  या निवडणूक कामासाठी 7 हजार 040 अधिकारी /कर्मचारी  यांची नियुक्ती केली आहे. उमरगा (अ.जा.)-13, तुळजापूर-13, उस्मानाबाद-20 आणि परंडा मतदार संघात 10 असे एकूण 56 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात 1 हजार 361 मतदान केंद्रावरुन मतदान होणार आहे.           
मतदान कर्मचारी केंद्राध्यक्ष /सहा. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व पडदा नशीन मतदान केंद्रावरील कर्मचारी, पोलीस अधिकारी  व कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक,  केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ, मायक्रो ऑब्झर्व्हर,क्षेत्रिय अधिकारी व मास्तर ट्रेनर तसेच संवेदनशिल मतदान केंद्रवर कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.
अकरा ओळखपत्रांचा पुरावा मतदानासाठी ग्राह्य :
           निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान न करता परत जावे लागू नये, यासाठी इतर अकरा पुरावे ग्राह्य धरण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. 
यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, राज्य किंवा केंद्र सरकार,सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक लि. कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे छायाचित्र ओळखपत्र, बँक, पोस्ट ऑफिस यांच्याद्वारे दिले जाणारे छायाचित्र असणारे पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्टकार्ड, हमी योजनेचे जॉबकार्ड, श्रम मंत्रालय योजनेतंर्गत दिले जाणारे स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असणारे सेवानिवृत्ती वेतनाचे कागद, निवडणूक यंत्रणेकडून दिली जाणारी मतदार चिठ्ठी आदींचा समावेश आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदारांनी वरीलपैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र मतदानाच्या वेळी सोबत आणावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. 

 
Top