बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे महेश जगताप व दिपक राऊत यांनी तक्रार केली होती. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ (१) (ई) नुसार दिलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी निकाल देतांना बार्शीतील दोन नगरसेवकांची पदे अनर्ह ठरवून पद रिकामे केल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी दिले आहेत.
    राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष दगडचंद लोढा व स्विकृत नगरसेवक नागेश हरिभाऊ अक्कलकोटे असे नगरसेवकपद रद्द झालेल्यांची नावे आहेत. याचप्रमाणे दिपक पांडूरंग राऊत रमेश दिगंबर पाटील, श्रीमती विजया ज्ञानेश्वर खोगरे, श्रीमती कमल नामदेव सातपुते, अंबादास तुकाराम शिंदे, विजय विठ्ठल राऊत यांच्या विरोधात असलेल्या अवैध बांधकामाबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांनी निकाली काढून तक्रारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
     महेश अशोक जगताप यांनी सुभाष लोढा यांच्याविरोधात तर दिपक पांडूरंग राऊत यांनी नागेश अक्कलकोटे यांच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रारदारातर्फे ऍड्.करंजकर, ऍड्.मराठे यांनी काम पाहिले नगरपरिषदेतर्फे ऍड्.खंडेलवाल तसेच सामनेवाला यांचे तर्फे ऍड्.व्ही.के.जाधव, ऍड्.झालटे, ऍड्.रजपूत यांनी काम पाहिले.
 
Top