बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)    कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून उपसासिंचनचे काम केले आहे. काम न करता विरोधक मते मागतात. बार्शी विधानसभा मतदार संघातील उमेदवारी तुलना करा असे आवाहन राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सोपल यांनी केले. 
    गावातील दारुबंदी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे आवाहन सोपल यांनी भोईंजे या गावात केले. यावेळी, संपत अंधारे, विलास कवटे, किसन राऊत, शिवाजी उमाटे, अनंत करळे, बंडूभाई शाह, दत्ता निंबाळकर, शिवसेनेतून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणारे आण्णा भोसले आदी उपस्थित होते. महीलांसाठी शौचालये, रस्ते पुढीलकाळात निश्चितपणे ही कामे मार्गी लावली जातील. मी जे बोलतो ते करतो आणि तेवढेच बोलतो. विरोधकासारखी खोटी आश्वासने देत नाही. गावातील दारुबंदीची मागणी निश्चीतपणे पूर्ण करु. गारपीट दुष्काळनिधी 51 लाखाची मदत गावाला झाली आहे. ग्रामदैवत रामलिंग मंदीराच्या पायाभरणीला 8 लाखाची मदत केली होती. विरोधकांनी फक्त एक लाखाची मदत केली आहे.
    विरोधक जमीन के निचे, आसमानके उपरचे प्रश्न उपस्थित करतात असे खडे बोल सोपल यांनी वांगरवाडी येथे उपस्थित केला. यावेळी सोपल म्हणाले, महादेव नलावडे, अनंतराव तुपे, सुभाष ठोंगे, अनिल तुपे, बाळासाहेब साळुंके, कमलेश तुपे, मंजूर पठाण, नामदेव तुपे, रावसाहेब तुपे आदी उपस्थीत होते. इंजिनिअर कॉलेज, साखर कारखाने, सुत गिरणी, मेडीकल कॉलेज असे 2004 च्या विधानसभेच्या निवडणूकीत आश्वासने दिले होते त्याचे काय झाले असा प्रतिप्रश्न सोपल यांनी केला. उपसा सिंचन योजनेचा फायदा हा या गावाला सर्वप्रथम झाला आहे. केवल व्यक्तीद्वेषाने विरोधक टिका करतात.
 
Top