बार्शी  (मल्‍लीकार्जून धारूरकर)  विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंढे यांचे नाव सांगून समाजाला दिशाभुल  केला जात असल्‍याचे आरोप करून  उकडगाव येथील जुने सहकारी यांनी डोळ्यात पाणी आणून मुंढे यांचे छत्र गेल्याचे व त्यांच्यानंतर सोपल हेच यापुढे आमच आधार असल्याचे सांगीतले. आपण त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व आधार तुटू देणार नाही. मुस्लिम समाजाचीही दिशाभूल करण्यात येत आहे. शिवसेनेतील सभेत मुस्लिमाबद्दल  अपशब्द वापरण्यात आल्‍याचे सांगुन  स्वातंत्र्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांचे बलिदान होते, मौलाना आझाद यांनीही बलिदान दिले असल्याचे दिलीप सोपल यांनी म्हटले.
        बार्शी विधानसभा निवडणूक प्रचार समारोप जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मैनुद्दीन तांबोळी, नगराध्यक्ष रमेश पाटील, सुधीर सोपल, वैरागचे जि.प.सदस्य मकरंद निंबाळकर, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, गटनेते नागेश अक्कलकोटे, अब्बासभाई शेख, बाळासाहेब तातेड, विक्रम सावळे, विलास रेणके, विजय ढगे, नवनाथ चांदणे, अरुणा परांजपे, विश्वास शेंडगे, विजय ठोंगे, पोपट डमरे, ऍड्.विकास जाधव, शिवाजी गायकवाड, माणिक पवार, किशोर शहा, मल्लिनाथ गाढवे, तानाजी मांगडे, गणेश जाधव, उस्मानअली शाह, येडशीकर, सुवर्णा शिवपुरे, मंदाताई काळे, सौ.डिसले, मंगल शेळवणे, सौ.स्वामी, सौ.बंगाळे, रिझवाना शेख, रिता लोखंडे, संगीता मेनकुदळे, सौ.सोडळ, सौ.बचुटे, अविनाश गायकवाड, नरेंद्र नलावडे, दिनेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top