उस्मानाबाद - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद (मेंढी व शेळी विकास महामंडळ तिर्थ बु.) ता. तुळजापूर या कार्यालयाकडून राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुके वगळून ग्रामीण भागामध्ये ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील फक्त उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा व वाशी या 5 तालुक्यामध्ये 50 टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गातील बेरोजगार युवकांसाठी 40 शेळया + 2 बोकड शेळी गट वाटप करण्यात येणार आहेत.
    यात शेळयांचा निवारा, खा्द्य व पाण्याची भांडी, जंतनाशक, गोचीड प्रतिबंधक औषधे, विमा, मुरघास/ मुरघास टाकी, कडबाकुटी यंत्रणा, निकृष्ट चारा प्रक्रिया प्रशिक्षण आदि बाबीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या गटाची किंमत 3 लाख रुपये असून या योजनेमध्ये  सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान एक लाख 50 हजार देय असून  व उर्वरीत 50 टक्के म्हणजेच  1 लाख पन्नास हजार रुपये लाभार्थींनी स्वत: अथवा बँक / वित्तीय संस्थेंकडून कर्ज घेवून प्रकल्प उभारावयाचा आहे.
          या जिल्ह्यासाठी पाच तालुक्यासाठी 15 गटाचे उदिष्ट देण्यात आले आहे. लाथार्थ्याने सर्वप्रथम स्वहिस्याच्या रकमेतून शेळी गटाच्या निवाऱ्याचे बांधकाम व इतर मुलभूत सुविधा उभाराव्यात लागतील. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधुन आपले अर्ज 22 नोव्हेंबर पर्यत दाखल करावेत. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्राची संपुर्ण माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेर्शी संपर्क करुन घेवून परिपुर्ण  अर्ज संबंधित संस्थेत दाखल करावेत.

 
Top