बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) छायाचित्रकार हा तयार करत असलेल्या तत्कालित प्रतिकृती ही कोणत्याही वस्तूवर पडणार्‍या प्रकाशाच्या छटा उतरवत असल्याने त्यास छायाचित्र ऐवजी प्रकाशचित्र म्हणल्यास वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन कराड येथील ख्यातनाम कलाकार उदय देसाई यांनी व्यक्त केले. सावळे आण्णा सभागृहात आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रवि फौंडेशनचे मधुकर डोईफोडे,  बार्शी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश कंगळे, एस.आर.के ग्रुप ऑफ डिजीटल लॅबचे सोमनाथ सेवकर, विनोद गुंड, सुनिल यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामदैवत श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तीन दिवस चालणार्‍या प्रशिक्षणत विविध कॅमेराची माहिती, मॉडेलिंग फोटो, टेबल टॉप व आऊट डोअर फोटोग्राफीचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 
Top