बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) संघवी क्वालिटी प्रॉडक्टस् प्रा. लि.  या कृषी क्षेत्रातील नामांकित कंपनीचा २७ वा वर्धापन दिन शुक्रवार रोजी मोठ्या उत्‍सहात साजरा करण्‍यात आला. गेल्‍या २६ वर्षांपासून कंपनीने युबीकेम या ब्रँडद्वारे शेतकरी बांधवांना त्यांच्या गरजेनुसार उच्च संशोधन करून नविनतम उत्पादने विद्राव्य खते, अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके आणि रासायनिक खतांचा योग्यरित्या उत्कृष्टपणे पुरवठा करित आली आहे. शेतकरी बांधवांना त्यांच्या पीकांसाठी, उत्पादन वाढीसाठी जे सर्वोत्तम आहे तेच देण्याचा कंपनीचा प्रयत्‍न राहीला आहे.
      शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ही कंपनी कार्यरत असून नजिकच्या काळात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्थानिक वितरकांच्या सहकार्याने आणखीन २५ ङ्ग्रॅन्चाईजीझ् सुरू करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
    भविष्यकालिन योजनांविषयी बोलतांना कंपनी चेअरमन  विनयभाई संघवी म्‍हणाले की, लवकरच औद्योगिक वसाहत क्र. ३ मध्ये दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये निर्मितीचा मोठा प्रकल्प संघवी ङ्गर्टिलायझर्स या कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्याची निर्मिती क्षमता प्रतिदिन २०० मेट्रीक टन खत इतकी असणार आहे.त्यायोगे सुमारे ५० हून अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच उत्कृष्ट गुणवत्तेची विद्राव्य खते परदेशातून आयात करून ती आपल्या शेतकरी बांधवांना स्‍वस्त दरांत उपलब्ध करून देण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.
    आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले सहकारी कर्मचारी, वितरक, पुरवठादार,बँकर्स, शासकिय कर्मचारी वर्ग आणि शुभचिंतक मित्र परिवार आणि नातेवाईक यांना दिले आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व शेतकरी बंधू, संलग्न वितरक, बार्शी शहरातील सर्व स्तरातील मान्यवर, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचे सरतेशेवटी त्यांनी आभार मानले.
 
Top