बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) घरातील वातावरणाचा मुलांच्या संस्कारावर परिणाम होतो. पालकांनी ते ओळखून मुलांचे सामाजिक ज्ञान वाढेल व बौद्धिक विकास कसा होईल यादृष्टीने विचार करावा. मुलांच्या आवडी निवडी ओळखून त्याची प्रगती साधावी असे प्रतिपादन दत्ता थोरे यांनी व्यक्त केले.
पाटील प्‍लॅटमधील सहयोग स्‍थानिक सहिवाशी मंडळाच्‍या मासिक सभेत प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. यावेळी दत्‍ता थेर, अतुल सोनिग्रा, संतोष ठोंबरे, अविनाश सोलवट, नायब तहसीलदार उत्‍तम पवार, परशुराम करंजकर आदी उपस्थित होते.
दत्‍ता थेर म्‍हणाले , घरामध्‍ये आपण कसे व्‍यक्‍त होतो याचा मुलावर परिणाम होतो. त्‍यांच्‍यासमोर काही गोष्‍टी लपवू नका, मुलांमध्‍ये समरसव्‍हा, आई हा लहान मुलांचा पहिला गुरू आहे. आपण कोणती‍ही वस्‍तू पारखून घेत, मात्र मुलांच्‍या आयुष्‍यांकडे तेवढे पाखरून पाहत नाही. मुलांमध्‍ये रममान होवून त्‍यांच्‍याकडे प्रयोगशील नजरेने पहा. लहान मुले हि प्रयोगशील असतात. लहान मुलांचा सर्वात जास्‍त प्रश्‍न पडतात. लहान मुल हे ख-या अर्थाने शास्‍्त्रज्ञ असते. लहान मुलांचे कुतूहल सारणे हे भविष्‍यातील शास्‍्त्राज्ञाला मारण्‍यासा
रखे आहे. मुलांना बोलू द्या. त्‍यांना गप्‍प करून हात बांधू न देता त्‍यांना मनसोक्‍त खेळू द्या.  राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी प्राचारक संजय देशपांडे म्‍हणाले, सुसंस्‍कारित समाजासाठी स्‍वतेत्रता व त्‍यामध्‍ये व्‍यापकता असावी. समाजात वावरताना सर्वांप्रति कृतज्ञता असावी. मानूस म्‍हणून जगतांतना प्रत्‍येकाने दान - धर्मासोबत माणुसकी जोपासवी. अतुल सोनिग्रा म्‍हणाले, सहयोग स्‍थानिक मंडळाने परिसर स्‍वच्‍छतेबरोबरच बार्शीकरांची सांस्‍कृतिक भूक भागवली. संस्‍कृती जतन करण्‍याचा प्रयत्‍न केला. परशुराम करंजकर, सतिश गोडगे - पाटील, प्रा. विलास जगदाळे, प्रकाश गव्‍हाणे, प्रताप जगदाळे, अविनाश सोलवट आदींनी आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल बनसोडे, विलास बारंगुळे, रामदास तिकटे व कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी नवरात्रत्‍सवातील दांडिया स्‍पर्धेच्‍या विजेत्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
 
Top