पांगरी(गणेश गोडसे) समाज एकीकडे आजचा तरुण दिशाहीन होत आहे,वाया गेला आहे,तरुण कोणाचेही ऐकत नाही अश्या मोठमोठ्या गप्पा मारताना दिसतो.मात्र गळा काढून ओरडणार्‍या बुजूर्गांनाही कांही ध्ययवेडे तरुण वेगळेपण दाखवून तरुणही कुठे कमी नसल्याचे  दाखवून देत आहेत.आगळगांव ता.बार्शी येथील जिद्दी तरुणांनी स्वच्छ्तेचा  जागर मनात तयार करून प्रत्येक रविवारी तरुणाच्या पुढाकारातून गाव स्वच्छ करण्याचा माणस केला असून या उपक्रमाचा गावातून रविवारी दि 2 रोजी प्रत्येक्ष  श्रीगणेशाही केला आहे.युवकांच्या या विधायक उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.   रविवारी सकाळी आगळगांव येथील उमद्या तरुणांनी एकत्रित येत आपणही ज्या गावाच्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे,गावाचे,समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने किमान आपण आपल्या श्रमातून आपले गांव स्वच्छ करू शकतो हा उद्देश समोर आला.त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी गावातील विठ्ठल मंदिर ते बसथंबा रोड पुर्णपणे झाडून तो स्वच्छ करून कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.तरुणांनी सुरू केलेली स्वच्छ
  ग्रामस्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी मधुकर गरड,सागर गरड,कुमार लंगोटे,महेश गरड,अमर शेख,बबलू गटकळ,दादा डमरे,सागर गुळवे,राहुल डमरे,संतोष थिटे,लखण मडके,अतुल डमरे,दयानंद डमरे,सुनील शिंदे,वैभव गरड,रामदास नांदवटे,अक्षय गटकळ,नागेश गटकळ,विशाल माळी,सूर्यकांत थिटे,हाणीफ आतार,विशाल गरड यांच्यासह बहुसंख्य तरुण हजार होते.
ता मोहीम राजकारण विरहित असून लोकांना स्वच्छतेची सवय व्हावी हा हेतु यामागे असल्याचे व प्रत्येक रविवारी गावातील एका  भागाची निवड करण्यात येईल असे या मोहिमेतील तरुणांनी यावेळी जाहीर केले.ग्रामस्थांच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी होणार असल्यामुळे यातील सहभाग वाढणे गरजेचे आहे.युवकांच्या पुढाकारातून सुरू झालेले कोणतेही काम यशस्वी होतेच.
 
Top