उस्मानाबाद - महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुकांनी आपले प्रस्ताव 21 नोव्हेंबर पुर्वी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधितांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उस्मानाबाद , कक्ष क्र. 15, डावी बाजू, तळमजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन  करण्यात आले आहे.
    राज्यस्तरीय पुरस्कारराचे स्वरुप एक लाख 1 रोख स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ,  विभागीय स्तरावरील 25 हजार रोख आणि जिल्हास्तरीय पुरस्कार 10 हजार एक रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी (महिला) महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचा 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलित मित्रपुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
            विभागीयस्तरीय पुरस्कार – (संस्था)  महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचे कार्य 7 वर्ष केलेले असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच तिचे कार्य व सेवाही पक्ष व राजकारणापासून अलिप्त असावे.
             जिल्हास्तरीय पुरस्कार (महिला) – महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचे 10 वर्ष सामाजिक कार्य केलेले असावे. ज्या महिलांना  दलित मित्र पुरस्कार  सावित्रिबाई फुले पुरस्कार ‍मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. याची संबधितांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे. 
 
Top