उस्मानाबाद -  जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या/ विधवांच्या पाल्यांना सूचित करण्यात ते की,  हेडकॉर्टर 1 सिंग्नल ट्रेनिंग सेंटर जबलपुर येथे 10 ते 14 नोंव्हेबरपर्यंत (युनिट हेक्वार्टर कोटा) सोल्जर टेक्नीकल, कलॉर्क सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    सदरील सैन्य भरती हि फक्त सिंग्नल कोअरमधून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी व सिंग्नलकोअरमध्ये सेवारत सैनिकांच्या पाल्यासाठीच आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सोल्जर जीडीसाठी 10 वी पास 45 टक्के मार्कस, सोल्जर क्लॉर्क / एसकेटीसाठी 12 वी पास 50 टक्के मार्कस, ट्रेसमॅनसाठी 10 वी पास तसेच हाऊस कीपर, मेसकीपरसाठी 8 वी पास असावा. सोल्जर जीडीकरीता वय साडेतसरा ते 21 वर्ष, सोल्जर क्लॉर्क/ एसकेटीकरीता वय साडेतरा ते 23 वर्षे तसेच ट्रेसडसमॅनसाठी वय साडेसतरा ते 23 वर्ष असावे. इच्छुक पात्र उमदेवारानी  या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top