बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) क्रीडा विभाग,सोलापूर आणि सोलापूर शहर व जिल्हा वुशू संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाच्या संघाची निवड करण्यात आल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.
    क्रीडा संकुल मधील इनडोअर स्टेडियम येथे दि.९ व १० ऑक्टोबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रीडाशिक्षक फुलचंद जावळे, प्रदिप हागरे, संजय पाटील, निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य मधुकर फरताडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
    या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या स्वप्नाली घोरपडे, पूनम शिलोमणी, सुप्रिया जाधव, अमृता सावळे, श्‍वेता बरीदे, आकाश भोसले, पंकज अंधारे, तेजस्वीनी आगलावे, अनिता कांबळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
 
Top