बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)    बार्शीच्या ११ वर्षीय आदित्य दसंगेसह पुण्यातील पंचवीस साहसी तरुणांची जनजागरण मोहिमबार्शी दि.३ (प्रतिनिधी) : बार्शीतील इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदित्य दसंगे (स्वामी) यांच्यासह पुणे येथील पंचवीस साहसी तरुणांनी पुणे ते गोवा असे ५४० कि.मी.अंतर सायकलवरुन पार करत प्रत्येक ठिकाणी पर्यावरण संरक्षणाचे जनजागरण केले.
    सायकल फेडरेशन पुणे आणि लाईफ सायकल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पर्यावरण जन जागरण पश्‍चिम घाट बचाव मोहिम राबविण्यात आली. समुद्र किनारपट्टीचा परिसर तसेच घाट रस्त्यातून दमट वातावरणात ही मोहिम कौशल्याची व साहसाची होती. मोहिमेतील वयाने सर्वात कमी असलेल्या आदित्य दसंगे याचे सर्व ठिकाणी कौतुक करण्यात आले. आदित्यने यापूर्वी बार्शी ते किल्ले रायगड हा सायकलवरील प्रवास पूर्ण केला होता. पुणे येथील महेश निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य मागील काही महिन्यांपासून सराव करीत आहे. त्याचे समवयस्क व युवा पिढीसाठी तो वेगळा आदर्श निर्माण करत असून बार्शीतील सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top