उस्मानाबाद - भारत संचार निगम लि. महाराष्ट्र परिमंडळ कार्यालयाकडून मूलभूत 100 लँडलाईन व ऐड ऑन, यकीन नही आता (YNA), महाराष्ट्र-गोवा अनलिमिटेड (MGU) व  (MGU+YNA) साठी दि. 1 नोव्हेंबर-2014 पासून  निश्चित मासिक शुल्क 50 रुपये वाढ करण्यात आली असल्याची भारत संचार निगम लिमिटेड, उस्मानाबाद यांच्या विपणन ( मार्केटींग) विभागाने कळविली आहे. 
    याशिवाय ब्रॉड-बँड प्लॅन- बीबी जी-275, बी.बी.होम यूएल-545,बीबी होम कोंबो यूएलडी-800, बीबीजी कोंबो यूएलडी 900 व तसेच बीबी होम कोंबो यूएलडी 999 चे सध्याचे सर्व ग्राहकांसाठी व नवीन ग्राहकांसाठी निश्चित मासिक शुल्क वाढ आकारण्यात आली आहे. ती फक्त गडचिरोली, सोलापूर, धुळे, परभणी, यवतमाळ, जालना, सिंधुदर्ग आणि वर्धा या दूरसंचार जिल्ह्यांसाठी लागू होईल.
    सध्याचे अस्तिवात असलेले ग्राहक ज्यांनी वार्षीक, द्वीवार्षीक, त्रै-वार्षिक प्लॅन निवड केलेली आहे. त्यांना वार्षीक, द्वीवार्षीक, त्रैवार्षिक  प्लॅन संपेपर्यंत वाढीव शुल्क आकारण्यात येणार नाही. सर्व ग्राहकांनी दि.1 नोव्हेंबर,2014 पासून निश्चित मासिक शुल्कात वाढ करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.          
 
Top