बार्शी -  जिल्ह्यातील विविध ठिकाणी थैमान घातलेल्या डेंग्यूसदृश्य रुग्णांमुळे हाहाकार उडाला असल्याने बार्शीत अनेक रुग्ण डेंग्यूसदृश्य आढळल्याने बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण करुन दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.   
         पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्षा अरुणा परांजपे, आरोग्याधिकारी विजय गोदेपूरे, शमशोद्दीन केमकर, अमर नागटिळक आदी उपस्थित होते. पत्रकारांशी चर्चा करतांना आरोग्याधिकारी गोदेपूरे यांनी शहरातील संपूर्ण स्वच्छता करणे हे अवघड काम असून नगरपरिषदेकडून तितक्या प्रमाणात काम होत नसल्याची कबूली दिली. शहरातील विविध ठिकाणी उघड्या विहीरी व सांडपाण्याचे स्त्रोत या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न होत असून सुभाष नगर परिसरातील महिलेच्या डेंग्युमुळे झालेल्या मृत्यूबाबत आपल्याकडे रक्ताचे नमुने उपलब्ध नसल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला हे सांगता येत नसल्याचे सांगीतले. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता ठेवून नगरपरिषदेला सहकार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

 
Top