उस्मानाबाद -  कळंब शहरानजिकच्या केज रस्त्यावरील मांजरा नदीपात्रात करण्यात येत असणाऱ्या वाळू उपशाप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी थेट घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली. याप्रकरणी वाळूची वाहतूक करणारा ट्रक तसेच जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पंचनामा करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी तहसील कार्यालयाला दिले.
    शुक्रवारी दुपारी डॉ. नारनवरे यांनी उस्मानाबादहून थेट कळंब गाठले आणि तेथे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार सुनील कावरखे व एम.जी. शिंदे, मंडळ अधिकारी तुकाराम आमले आणि तलाठी एरंडे हेही त्यांच्यासमवेत होते.
    नदीपात्रातील संबंधीत वाळू उपसा केलेल्या जागेचा पंचनामा करण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी दिले. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीवरुन या ठिकाणी 215 ब्रास वाळू उपसा झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना 13 लाख 33 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  
 
Top