पांगरी (गणेश गोडसे)  शौचालयासाठी  शासन विविध स्तरावर अनेक  योजना राबवून जनजागृती करत घर तेथे शौचालय ही मोहीम राबवत असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभधारकांनी घेऊन गावे निर्मलग्राम होण्यासाठी सहभाग नोदवावा असे प्रतिपादन बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापति व पांगरीच्या पंचायत समिति सदस्या सौ.कौशल्या माळी यांनी केले.त्या शौचालय दिनानिमित्त पांगरी ता.बार्शी येथे बालविकास सेवा योजना प्रकल्पाआंतर्गत आयोजित विभागीय महिला व पालक मेळाव्यात बोलत होत्या.यावेळी अंगणवाडी समन्वयक सौ.एस.पी.सवणे उपस्थित होत्या.
 प्रारंभी सौ.एस.पी.सवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी शहरातून विद्यार्थ्यांची स्वछता संदेश देत फेरी काढण्यात  आली.शौचालय बांधा,आरोग्य सांभाला आदि संदेश यावेळी देण्यात आले.तसेच सवणे यांनी शौचालयाचे महत्व उपस्थित महिलांना पटवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.यावेळी महिलांनी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.कार्यक्रमाला संगीता नाईकवाडी, रतन काळे, प्रमीला झानपुरे, नजमूद्दीन आतार ,कविता मोरे यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
 
Top